पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] १९ ऋषींनी भगवंताचा फार सत्कार केला व त्यांची यथाविधि पूजा केली, तेव्हां- 'पासून बद्रिकाश्रमास बद्रिनारायण असें नांव पडलें आहे. नंतर श्रीकृष्ण मेरू. ‘पर्वताच्या पृष्ठभागावर गेले व तेथे शंकराची एकनिष्ठपणें सेवा करूं लागले, ऊन, वारा, पाऊस या सर्वांचा त्रास सोसून पुत्रकाम नेसाठी चालविलेली कडकडीत तपश्चर्या पाहून शंकर पार्वतीसह कृष्णाकडे आले. शंकरांनी कृष्णास प्रेमानें आलिंगन दिले व ते ह्मणाले; “कृष्णा, तूं माझें दैवत आहेस, तूं सकल चराचराचा नियंता व सर्व देवांचा देव असतां अशी तपश्चर्या करणें हें अनुचित होय." मग श्रीकृष्ण ह्मणाले; "आपण सर्व देवाधिदेव महादेव आहांत, आपल्या आशीर्वादासाठी आपली सेवा करणें अवश्य आहे." हे ऐकून शंकर ह्मणाले; "वा कृष्णा, तूंच सर्व कर्ता करविता आहेस. तुला आमच्या आशीर्वादाची काय अवश्यकता आहे ? तुझ्या तपाने मी फार संतुष्ट झालों असून रुक्मिणीच्या पोटीं मदन जन्म घेईल असा मी तुला आशीर्वाद देतो. तसेंच तुला एक लक्ष साठ सहस्र सुपुत्र होतील व ऐशी हजार सुंदर व सुलक्षणी मुली होतील." याप्रमाणें श्रीकृ ग्णास वर देऊन महादेव पार्वतीसह कैलासी निघून गेले. या वरदानानें श्रीकृ- ग्णासहि फार संतोष झाला व ते मोठ्या आनंदानें द्वारकेस परत आले. आपला राजा परत आलेला पाहून द्वारेकच्या लोकांनी मोठा आनंदोत्सव केला. रुक्मि- 'णीस त्यावेळी किती आनंद वाटला असेल याची कल्पनाच केली पाहिजे. नंतर कांही दिवसांनी रुक्मिणी गर्भवती झाली व नवमास पूर्ण झाल्यावर प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्या मुलाचें नांव मदन असें ठेविलें, त्या मुलाचे अतुलनीय सौंदर्य पाहून कृष्णास व रुक्मिणीस फार हर्ष झाला. श्रीकृष्णाचे पोटी मदन अवतीर्ण झाल्याची मुवार्ता सर्व पृथ्वीवर हां हां ह्मणतां पसरली.. परंतु ही सुवार्ता ऐकून शंबराची छाती भीतीनें धडधड करूं लागली. कारण मदनाकडून त्या शंबरासुराचा मृत्यु होता. आपला शत्रु लहान आहे तोंच त्याचा नाश केला पाहिजे असा विचार करून शंबरासूर लागलाच द्वारकेजवळ आला; परंतु शहरांत त्याचा शिरकाव होईना. द्वारकेचें भोंवतीं श्रीकृष्णाचें सुदर्शन चक्र सारखें फिरत असल्यामुळे त्याचा द्वारकेंत मुळींच प्रवेश होईना. द्वारकेंत कसा प्रवेश होईल हे पाहण्यासाठी शंबर द्वारकेच्या भोवती सारखा फिरत होता, पण त्यास वाट दिसेना. सुदर्शन चक्र डोळ्याचें पातें लवतें इतक्या अवकाशांत एकवीस वेळां फिरत होतें, अशी चक्राची विलक्षण गति असल्यामुळे द्वारकेत वाऱ्याचा रिघाव होणेंहि कठिण होतें, मग शंबराचा रिघाव कोटून होणार ? परंतु पांचव्या दिवशीं बाळंतिणी जवळ सटवी येणार असें जाणून त्या दिवशीं भगवंतांनीं मुदर्शनचक्र काढून घेतलें. ती संधी साधून, रात्रीं नगरीतील सर्व लोक निद्रिस्थ आहेत असे पाहून शंबर नगरांत गेला, व गुप्त रूपानें प्रसुतिस्थानीं जाऊन मदनास घेऊन लागलीच तेथून पळून गेला. अध्याय ४ था.