पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ स.] अध्याय १४ वा. vi 66 ब्रह्मदेवांकडे पाहूं लागले. तेव्हां सर्व देवांनी महादेवांनां साष्टांग नमस्कार केला. मग ब्रह्मदेवाला शंकर म्हणाले; " हे चतुरानना ! तुझ्यावर माझा अत्यंत लोभ आहे, सर्व भक्तांमध्ये मला तूं फार आवडतोस, तुला इतकें भिण्याचें कांहींहि कारण नाहीं. दक्षयज्ञाचे वेळीं तूं माझा अभिमान धरून यज्ञाला गेला नाहींस हे माझ्या लक्षांत आहे, पण हे बाकीचे सर्व देव मला त्यावेळी निर्माल्यवत् समजून उन्मत्त झाले, व तो अज्ञानी दक्ष जसे सांगू लागला तसे हे वागले. यज्ञांत मिळणाऱ्या थोड्याश्या हविर्भागाच्या आशेनें यांनी आपला अभिमान सोडून दिला, आपले ब्रीद सोडिलें, व तेज गमावून त्या मंडपांत लांगूलचालन करूं लागले. शंकराला हविर्भाग न दिल्यास आम्हीहि कोणी हविर्भाग घेणार नाहीं, असें जर त्यावेळी यांनी त्या उन्मत्त दक्षाला बजाविलें असतें, तर हा एवढा अनर्थ मुळींच ओढवला नसता. " शंकरांचे तें भाषण ऐकून, ब्रह्मदेव म्हणाला; " हे कैलासपते ! ही या देवांकडून मोठी चूक झाली, परंतु ती सती प्रसूती अगदी निर्दोष असून तिला या कामी निष्कारण दंड मिळाला. आतां तरी तिला तिचा पति परत मिळावा अशी विनंति आहे. ती आज एक हजार वर्षांपर्यंत पतिप्राप्तीसाठी पतीचें कलेवर हृदयाशी धरून एकनिष्ठपणे तपश्चर्या करीत आहे. व तपश्चर्या करीत असतां तिचें मांस सर्व झडून जाऊन फक्त अस्थि राहिल्या आहेत. तसेंच या देवांवरहि आतां कृपा झाली पाहिजे. • आजवर त्रिभुवनांत कोणीहि थज्ञयागादिक कर्मे केली नसल्यामुळे यांनां हविर्भाग असा मुळींच मिळाला नाही, आणि तूं दक्षाला जिवंत न केल्यास पुढेहि यज्ञ होण्याची कांहीं आशा नाहीं; तसे झाल्यास हे बिचारे अन्नावांचून मरण पावतील, हे मोठे अपराधी आहेत, परंतु त्या अपराधाचें फळ ह्यांनां आजवर चांगले मिळाले आहे, तेव्हां ह्यांनां आतां क्षमा करून ह्यांच्यावर कृपा कर; हे केवळ अज्ञानामुळे फसले तेव्हां ह्यांचे अपराध पोटांत घातले पाहिजेत; ह्यांचे संरक्षण आपण स्वतः न केले, तर यांनां जगांत कोणी संरक्षक राहिला नाही असे होईल. ह्मणून हे देवाधिदेवा ! पृथ्वीवर पुन्हां यज्ञयागादि कर्मे होतील अशी तजवीज आपणासच केली पाहिजे. नाहीतर भर्माचा क्षय होऊन मोठा अनर्थ होईल. तुझा हा हविर्भाग वर्ज केल्यामुळे दक्षाचा वीरभद्रानें नाश केला, पण हे पशुपते ! यापुढे सर्वाआधी तुला हविर्भाग आह्मी देत जाऊं. शिवद्वेष धरून जो यज्ञयागादि कर्मे करील कर्मापासून पुण्यप्राप्ति तर होणार नाहीच, पण उलट नरकाची मात्र प्राप्ति होईल. हे भूतनाथा ! तूं सर्वात श्रेष्ठ आहेस: तुझी सर्वोवर पित्याप्रमाणें दया पाहिजे, व ती तशी आहेहि; तसे नसते तर तूं समुद्रमंथनाचे वेळीं विष घेतलें नसतेंस, तूं वडिलपणाच्या नात्यानें हलाहल विषाचा स्वीकार करून इतर सर्व देवांचे संरक्षण केलेंस त्याला