पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक षट्चक्रे भरून टाकिलीं होतीं आणि त्यामुळे सर्पिणीनें ऊंच मस्तक कलें होतें. पश्चिमेकडून सूतिला मार्गानें बहात्तर हजार नदींचे रस आणून त्यांनीं एकवीस स्वर्ग भिजविले होते. सोहं श्वासानें पन्नास स्वर्ग बुडून गेले होते. अग्नि चक्राचे ठिकाणी श्रीअनंतास आणून तेथें शंकर त्याला स्नान घालीत होते. त्या ध्यानावस्थेत कांहीं ध्येयहि नव्हतें व कोणी ध्याताहि नव्हता. तेथें चंद्र नव्हता, तारे नव्हते, आणि सूर्यहि नव्हता, परंतु ज्योत होती. ती ज्योत पाहून महादेव आपणा स्वतःस विसरले होते. तो परमानंद फक्त योग्यानांच माहित. महादेव ज्याप्रमाणें समाधि लावून बसले होते, त्याप्रमाणें नंदी, कुबेर, मणिमंत, वीरभद्र, चंडीश, भृंगी वगैरे महादेवांचे सेवकहि महादेवांजवळ आपआपल्या शक्तीप्रमाणें समाधि लावून बसले होते. कोणी शून्य तारा अवलोकन करीत होता, कोणी ईश्वराला अंतःकरणांत पहात होता, कोणी प्राणवायू नासिकाग्री आणिला होता, तर कोणीं डोळ्यांत आणिला होता. असा तो योग्यांचा दिव्य आश्रम पाहून सर्व देवांनां आज आपण पवित्र झालों असे वाटू लागलें. तेथें जो ऋषिसमूह होता तोहि शंकराप्रमाणेंच योगानं- दांत मग्न झाला होता. कित्येक अंतःकरणांतील ज्ञानदीप पाजळून शंक- राला पहात होते, कित्येक उलटी दृष्टि करून जोतिर्लिंग स्थापित होते, कित्येक निश्चळ मनानें स्तंभाप्रमाणे स्थिर बसून संसारसृष्टि व स्वतः या सर्वांस विसरले होते, कित्येक तद्रूपता पावले होते, कित्येकांनी देहाला सोडून दिले होतें, कित्येक ऋषि धर्मचर्चा करीत होते, कित्येक वेदपठण करीत होते, कित्येक शास्त्रांची मिमांसा करीत बसले होते, कित्येक शंकराचें नामस्मरण करीत होते, व कित्येक सगुणभक्ति करीत होते तर कित्येक निर्गुणभक्ति करीत होते. अशा त्या भक्तजनसमूहांत बसलेल्या महादेवाला आपली प्रार्थना कशी कळवावी याचें ब्रह्मदेवाला देखील गूढ पडलें. मग ब्रह्मदेव अत्यंत करुणाजनक अशा वाणीनें महादेवाला म्हणाला; "हे उत्पत्तिस्थितिलयकरा ! परात्पर परमे- श्वरा ! हे महारुद्रा जगन्नाथा ! हे सगुणा निर्गुणा ! हे भक्तवत्सला नोळकंठा ! तूं आद्यमूर्ति आहेस. तुझ्या शक्तीचा पार कोणालाहि लागला नाही. कोळी नावाचा किटक आपल्या पोटांतून तंतु काढून त्याचें निमिषार्धीत जाळे तयार करितो व तें पुन्हां निमिषार्धीत पोटांत सामावितो, त्याप्रमाणे हे प्रभो ! तूं ही सृष्टि क्षणांत निर्माण करितोस व क्षणांत तिचें निर्मूलनही करितोस. स्वर्ग, व नरक, ह्रीं पुण्यवान् व पापी यांच्यासाठीं तूं निर्माण केली आहेस. हे. देवाधिदेवा ! हे कैलासपते ! तूं आपल्या भक्तांचे अपराध पोटांत घालून त्यांचे संरक्षण करण्यास समर्थ आहेस. हे पशुपति ! आम्ही तुझी प्रार्थना करित आहों तर आम्हांवर दया कर व आमचे म्हणणे ऐकून घे. " ब्रह्मदेवानें याप्रमाणे अंत:- करणपूर्वक करुणा भाकिल्यावर महादेवांनी आपले डोळे उघडिले व ते सप्रेम दृष्टीनें