पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३.रा. ] अध्याय १४ वा. ९३ व घरोघर शिवपूजन, शंकराचें ध्यान, भजन, कीर्तन, स्तवन करीत असत. योगी, तापसी, ब्रह्मचारी वगैरे समाधी लावून शंकरांची आराधना करीत होते; ब्राह्मण तेथील पवित्र नदीतिरीं स्नानसंध्या करीत होते; शिवमंदिरांत भेरी, नौबती, कर्णे, तुताऱ्या, टाळ वगैरे वाद्यांच्या गजरांत शंकरांची आरती चालली होती, असे ते नयनरम्य अलकापूर पाहून सर्व देवांनां आज आपल्या डोळ्यांचे पारणे फिटल्यासारखे वाटलें. या अलकापुरीच्या पुढे शंकर तपश्चर्या करीत बसले होते, त्यांच्याकडे जावयाचें ह्मणजे शुचिर्भूत होऊनच गेले पाहिजे; असा विचार करून देवांनी त्या अलकावतीजवळ वहात असलेल्या नदीत स्नानसंध्या वगैरे कृत्यें आटोपून ते शुचिर्भूत झाले व त्यांनी पुढे मार्ग क्रमण्यास आरंभ केला. अलकावती सोडून कांहीं मार्ग कमिल्यावर एक मोठा वटवृक्ष दिसूं लागला. तो चटवृक्ष शंभर योजनें उंच असून त्याचा विस्तार ऐशीं योजनांचा होता; त्या चटवृक्षाला अनंत शाखा असून सहस्र पारंब्या होत्या; त्या वटवृक्षाखाली महादेव तप करित बसले होते; तपामुळे अत्यंत दैदीप्यमान अशी महादेवांची मूर्ति पाहून सर्व देवांच्या अंतःकरणांत भीति उत्पन्न झाली. सर्व देव ब्रह्मदेवाला पुढे करून च्याच्या आश्रयानें मागून हळू हळू जाऊं लागले. त्या वृक्षाखालीं कित्येक महान "महान् तपस्वी तप करीत बसले होते व त्यांच्या मध्यभागीं शंकर तपश्चर्या करीत होते. तो एकंदर तापसीजनांचा समूह पाहून आकाशांतील नक्षत्रमंडळ भूमीवरच आले आहे असे वाटू लागले. ते अनेक ऋषि तारकांप्रमाणे व शंकर, चंद्राप्रमाणे दिसत होते. जसा सोन्याच्या कोंदणांत बसविलेला हिरा शोभतो त्या- प्रमाणे त्या ऋषिसमूहांत महादेव शोभत होते. अशा त्या परम तेजस्वी महादे- चाला पाहून सर्व देव अत्यंत नम्र झाले व शंकरापुढे हात जोडून उभे राहिले. शंकराची ती सतेज शुभ्र मूर्ति त्या वेळीं फारच शांत दिसत होती. व समाधी लाविलेली असल्यामुळे ती स्फटिक मूर्तिप्रमाणे स्थीर दिसत होती. सर्वांगाला भस्म लाविलें होतें, बसण्यासाठी दर्भासन घेतले होतें, कंठांत रुद्राक्षांच्या माळांची गर्दी झाली होती, हातांत अक्षमण्यांची माळ होती, विशाळ कपाळावर चंद्राची कार्खेत कोर प्रकाशमान झाली होती, पिंगट झालेल्या जटा पाठीवर रुळत होत्या, दंड धरून त्यावर भार टाकिला होता, व्याघ्रांबरानें शरीर आच्छादन केलें होतें, मस्तकावरून पवित्र गंगा वहात होती, हृदयावर मालेतील रुंडमणी लोळत होते, सर्पोचीं भूषणें ठिकठिकाणी घातली होतीं, खड्ग, त्रिशूळ, परशु, शंत्र, डमरु, नानाशक्तींचे बीजमंत्रांनी युक्त सुनाभचक, धनुष्य, पाशुपतास्त्र, माळा, नागपाश च वीरघंटा, अशी आयुधे वगैरे हातांत होतीं, आणि भगवान नीलकंठ, पांचहि मुखांनी रामनामाचा जप करीत होते. त्यांनी त्यावेळी सिद्धासन घातले होतें. कंबर नागबंधनांनें आंवळलेली असून तर्क मुद्रा धारण केली होती. इडा पिंगळेचा वायु त्यांनीं सुषुम्नेंत नेऊन त्या योगानें अक्ष-