पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ कथाकल्पतरु. [ स्वचक्र: बरोबर ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, वरुण, अग्नि, वायु, रवि, कुबेर, निऋति, यम, गंधर्व, विद्याधर, यक्ष, सिद्ध, सनत्कुमार, प्रजापति, किन्नर, ग्रह, वेताळ, वगैर ज्यानां ज्यानां यज्ञयागाचे वेळीं हविर्भाग मिळत असे ते सर्व होते. त्यांच्या समवेत विष्णु विमानांत बसून निघाले ते प्रथम मेरुपर्वताच्या पलीकडे सिद्ध सरोवर होतें, त्या सरोवराजवळ मुक्काम करण्यास उतरले. तें सरोवर अत्यंत रम्य असून सर्व प्रकारच्या कमलपुष्पांनीं व हंसादि पक्ष्यांनी अत्यंत रमणीय होतें. अशा त्या मनोहर सरोवराच्या दर्शनानें लक्ष्मीरमण विष्णूला फार आनंद झाला. तो सरोवरांतील उदक घेण्याकरितां निघाला; तो तेथें एक शिळा असून त्या शिळेवर एक सोन्याच्या कमलपुष्पांची वैजयन्ती माला होती, ती पाहून श्रीहरिला कार समाधान झाले. त्याने ती माला गळ्यांत घातली. त्या दिवसापासून ती माला विष्णु अक्षय्य गळ्यांत धारण करूं लागला; ती वैजयंती माळा गळ्यांत घात- ल्यावर विष्णु ज्या कार्यासाठी ब्रह्मदेव वगैरे देवांबरोबर आले होते, त्या कार्यालय जाऊं नये असे त्यानां वाटलें. ते ब्रह्मदेवाला ह्मणाले; " ब्रह्मदेवा ! तूंच या सर्व देवांनां घेऊन महादेवांकडे जा, मी गेलों असतां ते मजवर क्रुद्ध होतील; दाक्षा- यणांसाठीं ते अत्यंत दुःखी झालेले आहेत. तेव्हां मी त्यांना कांहीं सुचविल्यास ते माझ्या दुःखावर डागण्या देण्यासाठी तूं आला आहेस, असें मला दूपण देतील; आणि खरें संकट तुह्मांवर आहे, तेव्हां तुझीच त्यांची विनवणी करणें हें बरें.” असें म्हणून विष्णूनीं ज्या शिळेवर वैजयंती माळा होती, त्या शिळेचा उद्धार केला व ते तेथून निघून वैकुंठास परत आले. , ५ महादेवाचा आश्रम. विष्णु याप्रमाणे सांगून तेथून निघून गेल्यावर ब्रह्मादि सर्व देवांनां पुढे कसे करावें हा मोठा विचार पडला. शेषशाई भगवान् केवळ आपणाबरोबर त्या शिळेचा उद्धार करण्यासाठीं व ती वैजयंती माला धारण करण्यासाठी आले होते असे सर्वांच्या लक्षांत आलें. महादेवांकडे जावें किंवा जाऊं नये, याचा सर्वानां विचार पडला होता, परंतु क्षुधेनें सर्वांचे प्राण कासावीस झालेले असल्यामुळे ‘त्यानां एकदांचा कांहीं तरी सोक्षमोक्ष करून घेण्यासाठी महादेवांकडे जाणें जरूर झालें होतें; मग तसेच सर्व देव धैर्य धरून त्या सिद्ध सरोवरापासून निघाले व पुढे मार्ग क्रमूं लागले. मार्ग क्रमित असतां, वाटेंत अलकापूर नावाची कुबेराची नगरी लागली; तेथें त्या दिवशी सर्व देवांनी मुक्काम केला. तें महादेवाचें अपूर्व "संपत्तिशाली मोठे शहर पाहून सर्व देव आश्चर्यानें थक्क होऊन गेले. तेथील मंदिरें सुवर्णाची असून त्या मंदिरांनां ठिकठिकाणी रत्ने बसविली होतीं. मुवर्णाच्या व रत्नांच्या कांतीनें तें नगर नेहमी दैदीप्यमान असे. त्या शहरांतील रस्ते, चौक, कारंजी वगैरे सर्व सुवर्णाचीं होतीं; तेथील स्त्रिया व पुरुष अत्यंत सुंदर असून त्यांची अंगकांति दिव्य अशी होती. प्रत्येक स्त्रीपुरुष धर्मरत असून