पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय १४ वा. करून “ हे वैकुंठपते ! मी पृथ्वीवर फिरत असतां माझ्या दृष्टीस एक मोठा चमत्कार पडला, तो सांगण्याकरितां मुद्दाम तुझ्याकडे आलो आहे. क्षिप्रा नदीचे कांठी जेथें दक्ष प्रजापतीने यज्ञ केला होता, तेथें त्या दक्षाची स्त्री प्रसूती पतीच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करीत बसली आहे. पतीच्या कलेवराला हृदयाशी धरून रामनामाचा जप करीत बसली आहे. त्या तिच्या तपश्चर्येमुळे तिच्या शरीरांतील • सर्व मांस नाहींसें होऊन फक्त अस्थि राहिल्या आहेत. अशा रीतीनें ती एक हजार वर्षेपर्यंत तप करीत बसली आहे. तिच्या शरिरावर मृत्तिकेचा डोंगर बनलेला आहे. हे अनंता ! आतां त्या साध्वीचा अंत पाहूं नकोस, ती साध्वी जोपर्यंत रागावली नाहीं तोपर्यंत ठीक आहे, नाहीं तर तूं आणि शंकर या दोघानांहि शाप देण्यास ती आतां समर्थ झाली आहे. " नारदाने असे सांगि- तल्यावर विष्णु ह्मणाले. " नारदा ! तूं ह्मणतोस हें खरें, पण या कामी शंकराचें साह्य घेतल्यावांचून हें कार्य कांहीं होणार नाहीं. महादेव हा माझा ईश्वर आहे. त्याच्या आज्ञेवांचून कांहीं करणें हें बरें नव्हे, आणि त्याच्या आज्ञेवांचून कांहींहि करण्याची माझी योग्यताहि नाहीं. त्यानें मला हें सुदर्शनचक्र देऊन दुष्टांचा संहार करण्यासाठी ठेविलें आहे, आपण स्वतः सर्व भोगविलास सोडून लक्ष्मीसारखे रत्न त्याने मला दिले आणि आपण तापसी होऊन माझ्या कल्या- णासाठी नेहमी तपश्चर्या करीत आहे. त्या नीलकंठानें ध्यान मला श्यामलत्व दिलें; अशा त्या शंकरावांचून हें कार्य करण्यास कोणीहि समर्थ नाहीं. तर तूं शंकराकडे जाऊन त्याची विनंति कर. " विष्णूनें असे सांगितल्यावर नारद तेथून निघून ब्रह्मदेवाकडे गेला, आणि ब्रह्मदेवाला ह्मणाला; हे चतुरानना ! आतां स्वस्थ बसण्यांत अर्थ नाहीं, तुझीं आणि श्रीहरि महादेवांकडे जा, व त्यांची विनवणी करून त्यांना प्रसन्न करून प्रसूतीला दक्ष मिळेल असें करा. नाही तर ती सती सर्व देवांवर क्रुद्ध होईल, व मोठा अनर्थ उडेल. " नारदाने असे सांगितल्यावर ब्रह्मदेव आपणाबरोबर इंद्रादि लोक- पाल घेऊन वैकुंठास गेला, व पुन्हां विष्णूची प्रार्थना करून ह्मणाला; "हे श्रीहरि ! हे लक्ष्मीरमणा! हे अनंता ! आतां आम्हां देवांची कांहीं तुला करुणा येऊं दे, एक हजार वर्षेपर्यंत इंद्र, वरुण, यम वगैरे कोणत्याही देवतांनां कोणाकडूनहि हविर्भाग · न मिळाल्यामुळे सर्वांचे अंतरात्मे तळमळत आहेत. तुझे घरीं कामधेनु असल्या- मुळे तुला कोणत्याहि गोष्टीचें उणें नाहीं; परंतु आह्मी सर्व यज्ञयागाच्या हविर्भा- गावर अवलंबून असल्यामुळे आम फारच हाल होत आहेत. तूं सांगितल्या- प्रमाणे आह्मींच महादेवांकडे गेलो असतो, पण ते कदाचित् आह्मांवर ऋद्ध होतील अशी आह्मांस भीति वाटते; तुजवर त्यांचें फार प्रेम आहे, तेव्हां तूंच त्यांची प्रार्थना केल्यास सहज कार्यभाग होईल." ब्रह्मदेवानें अशी विनंति केल्यावर विष्णूला सर्वांची दया आली, व ते महादेवांकडे जाण्यास निघाले. 66