पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक तुम्ही सर्व अभिमानानें प्रेरित होऊन वागलांत आणि आतां विटंबनेच्या वेळीं कसें करावें ह्मणून विचारण्यासाठी मजकडे आलांत. वीरभद्रानें जी तुह्मां सर्वांची विटंबना केली, ती योग्य अशीच केली असे मला वाटतें. तुह्मां सारख्या अवि- चाऱ्यांना मी सल्ला द्यावयाला असमर्थ आहे. त्या वेळीं जर तेथें नंदी नसता तर तुह्मां सर्वांनां त्या वीरभद्रानें मृत्युपुरीला पाठविलें असतें, पण त्याच्या दयेमुळें तुझीं सर्वजण जिवंत राहिला अहांत. तुमच्या विनंतीचा विचार मला मुळींच करितां येत नाहीं." विष्णूनी जेव्हां रागावून सर्व देवांनां याप्रमाणें • स्पष्ट कळविलें, तेव्हां ते देव निराश होऊन आपल्या स्थानाप्रत निघून गेले. ४ वैजयन्ती मालेची प्राप्ति. दक्षयज्ञाचा विध्वंस झाल्यानंतर त्रिभुवनांत कोणीहि यज्ञ करीना. जो तो यज्ञ करण्यास भिऊं लागला. शंकराला हविर्भाग देऊन यज्ञ करावा तर त्या संबंधानें दक्षानें असा शाप दिला होता किं, जो शंकराला हविर्भाग देऊन यज्ञ करील, तो यज्ञ निर्फळ होईल. वरें हविर्भाग न देतां यज्ञ करावा तर शिवगण येऊन विटंबना अशा अडचणींत सांपडल्या- मुळे जरी यज्ञ करण्याची इच्छा व शक्ति होती, तरी यज्ञ करण्याचें कोणास धैर्य होईना. अशा रीतीनें त्रिभुवनांतील यज्ञयागादि कर्मे बंद पडल्यामुळें ब्राह्मण उपाशी मरूं लागले, देवगणांनां हविर्भाग मिळेनासे झाले, आणि यजमान स्वस्थ बसल्यामुळे ऋषींचे मंत्रघोषहि बंद झाले. अशा प्रकारची एक हजार वर्षे गेल्यानंतर नारद संचार करण्यासाठी निघाला व तो फिरत फिरत, दक्षाची स्त्री प्रसूती जेथे पतीचें प्रेत घेऊन तप करीत बसली होती तेथें आला. त्या साध्वीची ती तपश्चर्या पाहून नारदमुनि अगदी थक्क होऊन गेला. त्या प्रसूतीचें सर्व मांस झडून जाऊन हाडांत कायतो प्राण राहिला होता, पतीला तिनें आपल्या बाहुपाशानें हृदयाशीं घट्ट धरिलें होतें, आणि मुखानें रामनामाचा सारखा जप चालविला होता. एखादें लहान मूल पांढऱ्या गारेचे बारिक खडे गोळा करून तें तांदूळ म्हणून जसे शिजवीत बसतें, त्या- प्रमाणे पतीचा लाभ आपणास होईल अशा दृष्टीने प्रसूती पतीला घेऊन बसली आहे असें नारदाला वाटलें. तें लहान मूल ते खडे लवकर शिजत नाहीत असे पाहून फेंकून देतें, व दुसरा कांहीं तरी खेळ खेळू लागतें, परंतु प्रसूतीची कोकिळेने सांगितलेल्या गोष्टीवर दृढ भावना होती. ती शरीरांतील मांस नाहींसे झालें तरी आपल्या पतीला जिवंत करण्याकरितां तपश्चर्या करित होती, आणि •तेवढ्यानें कार्यभाग न झाल्यास तिनें आपल्या शरिरांतील अस्थि देखील गमा- • वण्याचा निश्चय केला होता. तो तिचा निश्चय पाहून नारदाला तिची फार धन्यता वाटली व त्याला तिची फार दया आली. तो तसाच तेथून निघाला व विष्णुलोकीं जाऊन विष्णूला भेटला. विष्णूला नमस्कार करून तो झणाला; करितील; पुष्कळांनां