पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय १४ वा. ८९ सागून आपण आपल्या पतीच प्रेत हृदयाशी धरून तपश्चर्या करण्यास आरंभ केला. इकडे इंद्र वगैरे सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले व त्याला सांगू लागले किं, “ हे देवा चतुरानना ! शिवगणांनी त्या दक्षाचे यज्ञप्रसंगी आमची विटंबना केली. हे पहा, अद्यापि शरीरावर व्रण तसेच आहेत. दक्षाला वीरभद्रानें ठार मारिलें व त्याचे मस्तक यज्ञकुंडांत जाळून टाकिलें; आणि सर्व यज्ञयागाचा विध्वंस केला.” ती हकीकत ऐकून ब्रह्मदेवाला फार वाईट वाटलें, मग ब्रह्मदेव आपणाबरोबर सर्व देवांनां घेऊन वैकुंठास गेले, तेथें इंद्र विष्णूला ह्मणाला; " हे भगवंता ! शिवगणांनीं अत्यंत अनुचित असें कार्य केलें. दक्षप्रजापति यज्ञ करीत असतां त्याला मारून त्याचें शीर यज्ञकुंडांत टाकिलें व त्यांनी देव, ब्राह्मण व ऋषि यांची फारच विटंबना केली. यज्ञ चालला असतां प्रथम पार्वती तेथें आली व तिनें त्या यज्ञांत रुद्राला भाग नाहीं असें पाहून, रागानें आपला देह योगशक्तीनें दहन केला. यज्ञाचा यजमान दक्ष नाहींसा झाल्यामुळे यज्ञवागादि कम बंद पडली आहेत, तर हे प्रभो अनंता ! आपण कृपा करून दक्ष जिवंत होईल अशी कांही तजवीज करावी;" ती इंद्राची विनंति ऐकून विष्णूला करुणा न येतां क्रोध उत्पन्न झाला. तो ह्मणाला; " जशी कृति करावी तशी त्याची फळे मिळत असतात. दक्षानें महादेवाची जर निर्भत्सना केली नसती, तर त्याची अशी दशा झाली नसती, परंतु त्याचा विनाशकाल आल्यामुळे त्याला विपरीत बुद्धि झाली व त्या बुद्धीप्रमाणें तो वागला. ती महासती दाक्षायणी आपण होऊन त्याच्या घरी यज्ञसमारंभासाठीं आली; पण त्या उन्मत्तानें तिची विचारपूस देखील केली नाही. आपल्या एकूणसाठ कन्या श्रीमंत ह्मणून त्यानें त्यांचे कौतुक केलें, आणि दाक्षायणीचा तिरस्कार केला. अरे ! त्या दाक्षायणीची योग्यता तुझांपैकी एकाला देखील कळत नाहीं. अजाच्या कंठालाही स्तन असतात आणि हृदयालाही स्तन असतात. पण खरें दूध देणारे जसे हृदयाचे स्तन त्याप्रमाणे ती दाक्षायणी, दक्षाची मुलगी होती; पण त्या मूर्खानें कंठाच्या स्तनाला महत्व दिले, व दूध देणाऱ्या स्तनाकडे पाहिलेंहि नाहीं. ती दाक्षायणी मक्षिकांमध्यें मधुमक्षिकेप्रमाणे होती. तो दक्ष उन्मत्तपणानें महादेवांनां वाटेल तसें बोलूं लागला; त्यावेळी तुझीं कोणीहि त्याचा प्रतिकार कां केला नाहीं ? तो महादेव ह्मणजे अनादि ईश्वर, त्याचा पार कोणालाहि लागला नाही. त्याची शक्ति केवढी, त्याचें इंद्रिय- दमन केवढें, त्याची शांतता केवढी, त्याची तपश्चर्या केवढी, याची तुझांला कल्पनाच नाहीं. ज्याप्रमाणें मासा गळाला जाऊन धरितो, किंवा पतंग दिव्यावर उडी मारितो, त्याप्रमाणे दक्षप्रजापतीने आपल्या हातानें आपली विटंबना करून घेतली. ज्यावेळी दाक्षायणी रागावून देह दहन करूं लागली, त्यावेळी तुह्मांपैकी कोणी एकानेंहि तिची समजूत कां केली नाहीं ? एकानेंहि तिची क्षमा मागितली नाहीं, किंवा योग्य अशी सल्ला दक्षालाही दिली नाहीं ! त्यावेळी