पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[स्तबक निवाला असल्यामुळे आपण मन्मथास निष्कारण मारलें असें त्यांस वाटू लागले. कारण त्यांत मन्मथाचा कांहींच दोष नव्हता, तो इंद्राचा दास असल्यामुळे त्याला इंद्राची आज्ञा ऐकणें भाग झालें होतें. असे असतां आपण मन्मथास जाळले हैं बरें केलें नाहीं असे महादेवास वाटू लागले. महादेवास रतीचा तो शोक पाहून फार दया आली व त्यांनी तिला अभय दिले की, 'तुला तुझा पति द्वापारी मिळेल.' हे ऐकून रतीला कांहोंसे समाधान वाटलें, व ती एका बनांत पतीची प्राप्ती होईपर्यंत ब्रह्मचर्य व्रतानें राहून तपश्चर्या करूं लागली. रति याप्रमाणें ईश्वरभजनांत पतिविरहाचे दिवस घालवित असतांनां एके दिवशी दांवर त्या वनांत आला. त्याच्या दृष्टीस रति पडल्यावर तो कामानें वेडा झाला च तिच्या जवळ त्यानें तशी इच्छा प्रदर्शित केली. हें शंवराचें बोलणं ऐकून रति ह्मणाली; ‘ मी मदनाची स्त्री रति आहे, मी पतिव्रता असून ब्रह्मचर्य बतानें रहात आहे. मजकडून असदाचरण कधींहि होणार नाहीं. पृथ्वीवरील मदना- शिवाय सर्व पुरुष मला बंधु बापाप्रमाणे आहेत. आपण भलतेंच कांहीं बोलाल तर मी आत्महत्या करीन.' रतीचा असा निर्धार बघून शंबरास फार संतोष झाला. तो रतीला ह्मणाला; “बाई, मी बोललों त्याबद्दल मला क्षमा कर, तूं माझी धर्माची मुलगी आहेस. तूं माझ्या घरी येऊन सुखानें रहा. मी तुझें पोटच्या मुलीप्रमाणे पालन करीन." याप्रमाणे शंभरानें रतीला अभय दिले व तिला आपल्या घरी घेऊन आला. १८ .. कथाकल्पतरू. २ श्रीकृष्णास मदनाची प्राप्ती. 22 हंसिणी ह्मणाली; आतां मदनाचा जन्म द्वापारी कसा झाला, तें सांगतें. द्वार- केचे राजे श्रीकृष्णभगवान्, आपली स्त्री रुक्मिणी इच्यासह एकांती असतांनां रुक्मिणी आपल्या पतीला विनयानें झणाली, 'प्रभो, मला पुत्र नाही याबद्दल फार खेद वाटतो. अशा तारुण्यावस्थेत पुत्राची मला साहजिक इच्छा झाली आहे. मुलावांचून ही संपत्ति, राज्य व ऐश्वर्य मला उणें भासत आहे.” श्रीकृष्ण- भगवान्, आपल्या स्त्रीचें बोलणे ऐकून तिला लीलेनें म्हणाले; "रुक्मिणी, तूं फार सुंदर आहेस, तेव्हां तुझ्या पोटी जो सर्वात सुंदर असा मदन, तोच पुत्र होऊन यावा अशी माझी इच्छा आहे. मदन पुत्र व्हावा म्हणून कैलासपर्वतावर जाऊन श्रीशंकराची सेवा केली पाहिजे. तूं जर मला परवानगी देशल तर मी तपश्चर्या करण्यासाठी कैलासपर्वतावर जाईन, व शंकराचा प्रसाद मिळचीन." हे कृष्णाचें भाषण ऐकून रुक्मिणीला फार संतोष झाला व तिनें मोठ्या आनं- दानें आपली अनुमति दर्शविली. याप्रमाणें रुक्मिणीची या गोष्टीस अनुमति मिळाल्यावर, कृष्णानीं आपला बंधु बलराम यांस आपला मनोदय कळविला व त्याच्या स्वाधीन सर्व राज्यसूत्रे करून, भगवान् श्रीकृष्ण शंकराच्या प्रसादा- साठी निघून गेले. श्रीकृष्ण प्रथम बद्रिकाश्रमी आले, तेथे आल्यावर तेथील