पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय १४ वा. 66 • ते मला समजलें; पण शंकराचे मंदिरांत गेल्यावर प्रथम नंदीचे वृपणाला हात लावितात याचें कारण काय, ते मला माहीत नाहीं, तर ती कथाहि कृपा करू सांगावी. " तेव्हां वैशंपायन ह्मणाले; राजा ! एकदां श्रीविष्णूंनीं गरुडाला · बोलाविले व त्याला ते ह्मणाले; गरुडा ! विष्णुगण तुला अत्यंत पवित्र असें मानितात, तुझा मोठा मानमरातब ठेवतात व तूं अत्यंत शक्तिसंप्रन्न म्हणून तुझा फार धाक बाळगितात, तर तुझी अशी शक्ति तरी किती आहे ते मला एकदां कथन कर. " तेव्हां गरुड ह्मणाला, " देवाधिदेवा अनंता ! मी या त्रिभुवनाला देखील अजिंक्य असा आहे, मी रागावल्यावर कृतांत देखील माझ्या समोरून पळून जाईल, हे सप्तसमुद्र मी मनांत आणीन तर क्षणार्धात पिऊन टाकीन, अष्ट कुलाचलांनां पाहिजे तर पोटांत ठेवून देईन, ही सर्व सृष्टि पृष्ठभागावर घेऊन मी सहज आकाशांत उडेन, इंद्रादिक सुरगण यांनां तर मी झाडपाल्याप्रमाणें समजतों. माझी शक्ति अशी अतुलनीय आहे की नाहीं, याचा अनुभव स्वामीला अनेक प्रसंगी आलेला आहेच, तेव्हां माझ्या शक्तीविषयी आपणास अधिक कांहीं सांगावयाला पाहिजे असें नाहीं." गरुडाची ती गर्वोक्ति ऐकून विष्णु मनांतल्या मनांत हांसले व गरुडाला ह्मणाले; गरुडा ! तुझ्यासा- रखा वीर साया त्रिभुवनांत नाहीं, ह्मणून मी तुला आपल्या ध्वजस्तंभावर ठेवितों; तसेंच तुला आतां मी एक सांगतों कीं, कैलास पर्वतावर नंदी शिवमंदिराचे दर- वाजांत बसलेला आहे, त्याला मजकडे घेऊन ये, तो जर न येईल तर त्याला तूं आपली शक्ति खर्च करून घेऊन ये, पण घेतल्यावांचून परत येऊं नकोस." २ वृषभवृषणमाहात्म्य. विष्णूनी याप्रमाणे गरुडाला कार्य सांगितल्यावर गरुड तेथून तत्काल निघाला व कैलासास जाऊन त्यानें नंदीला आपणाबरोबर येण्याविषयी सागितलें, परंतु नंदी त्यावेळी ध्यानस्थ असल्यामुळे त्याला गरुडाचें बोलणें मुळींच ऐकू गेलें नाहीं. गरुडाचे अंगीं उन्मत्तपणा असल्यामुळे त्याला नंदी आपले बोलणे मुद्दामच ऐकत नाहीं असें वाटलें, व त्यानें जोरानें नंदीला हालवून तुला विष्णु बोलावीत आहेत ह्मणून सांगितलें. तो त्या गरुडाचा दांडगेपणा पाहून नंदीला फार राग आला, तो ह्मणाला; " अरे दुर्जना ! मी शंकराचें ध्यान करीत असतां तूं निष्कारण माझी समाधी मोडलीस, या अपराधाबद्दल तुला चांगली शिक्षा केली पाहिजे, असें ह्मणून नंदीनें जोरानें श्वास सोडिला, त्याबरोबर जसें वाऱ्याने झाडाचें पान उडून जावें, त्याप्रमाणें गरुड शंभर योजनें लांब उडून गेला. तो पुन्हा नंदीनें उच्छ्वासाबरोबर आकर्षण करून घेतला व त्याला पुन्हा श्वासशक्तीने दूर झुगारून दिलें. योगी ज्याप्रमाणें धूम्रपान करितो त्याप्रमाणें गरुड नंदीच्या श्वासशक्तीनें आकाशांतून भूमीवर व भूमीवरून आकाशांत जात येत होता. · अशा प्रकारें नंदीनें गरुडाला हजार वेळां आकाशांत फेंकून अगदी जर्जर केलें