पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ कथाकल्पत ६. [ स्तबक तुझ्या शक्तीचा पार मला लागत नाहीं, तुझ्यासारख्या बलसागराशीं युद्ध करणे हैं निरर्थक होय, तूं महा तेजस्वी असल्यामुळे पवित्र असाहि आहेस. तुझें नांच मी बसवेश्वर असें ठेवितों, तुला मी प्रसन्न झालों आहें, तुझी इच्छा असेल तें माग, मी तें तुला संतोषानें देईन. तूं आमच्याजवळ मागावेंस अशी आमची योग्यता नाहीं, आणि आह्नीं तुझ्या योग्य असें तुला देण्यासहि असमर्थ आहोत. नदी सागराला काय देणार ? अथवा खद्योत सूर्याला काय देणार ? किंवा चातक मेघावर प्रसन्न झाला तरी त्याला काय देणार ? त्या चातकासारखाच मी तुला प्रसन्न झालो आहे." तेव्हां नंदी ह्मणाला; “ हे 'जगन्नाथा ! तुझी इच्छा असेल तें तूंच मजजवळ माग, आज मला तुझ्या- सारखा याचक भेटला याबद्दलच संतोष वाटतो. " मग शंकर त्याला ह्मणाले, " नंदिकेश्वरा ! तूं मला मागितलेले देण्यास तयार झाला आहेस, तर तूं माझें वाहन हो, मी तुझ्यामुळे हे सर्व त्रिभुवन जिंकीन." शंकराची ती मागणी नंदीनें मोठ्या संतोषानें मान्य करून तो महादेवाला ह्मणाला; ‘हे कैलासपते ! मी आजपासून आपला सेवक झालों असून आपण माझे स्वामी झालां आहांत. आतां माझें मागणे एवढेच आहे किं, आपण अक्षय्य या सेवकाच्या सन्निध असावें. " महादेव ह्मणाले; “ नंदिकेश्वरा ! ही तुझी मागणी मी मोठ्या आनंदानें मान्य केली आहे; इतकेच नव्हे तर मी माझ्या अगोदर दर्शनाचा व पूजेचा मानही तुला देतों. जे कोणी तुझें दर्शन घेतल्यावांचून व तुझी पूजा केल्यावांचून माझें दर्शन घेतील व पूजा करितील त्यांची ती पूजा निर्फल होईल. तुला जरी मी आपलें वाहन केले आहे, तरी मी तुला आपल्या मस्तकावर थ्वजस्तंभी धारण करीन; आणि तुला आपल्या दृष्टीपासून क्षणभरहि दूर कर- णार नाही. तूं आपल्या उदरांत क्षीरसागरांतील दूध, नंदनवनांतील गवत व महातेजस्वी अशी शस्त्रें सांठविलींस म्हणून मी तुझें शेण अत्यंत पवित्र मानून त्याचें भस्म तयार करीन व तें सर्व शरिराला लावित जाईन. " याप्रमाणे शंकराचा व नंदीचा सहवास घडून आल्याबद्दल देवांना फार आनंद झाला, सर्व देव तेथें येऊन त्यांनी महादेवांचें नांव पशुपति असें ठेविलें. शिखी ऋषीला ते वर्तमान कळल्यावर त्यालाहि फार आनंद झाला. नंतर शंकर नंदीवर बसून वाद्यांच्या गजरांत कैलासीं निघून गेले. व अध्याय १४ वा. १ दक्षप्रजापतीला जीवन प्राप्ति. " वैशंपायन महाराज ! जनमेजय राजा नंदीची कथा ऐकून ह्मणाला; आपण सांगितलेल्या या कथेवरून महादेवांच्या अगोदर नंदीची पूजा कां करितात