पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

28 कथाकल्पतरु [ स्तबक पडली होती ती त्यानें दशदिशानां फेंकून दिली. त्या रत्नांपासून पुढे रत्नांच्या खाणी निर्माण झाल्या. तिकडे शंकर इंद्राला सावध करून 'तूं इकडे कसा आलास' म्हणून विचारूं लागले. तेव्हां इंद्रानें घडलेली सर्व हकीकत महा- देवाला सांगीतली व या आलेल्या संकटाचें निवारण करण्याविषयी शंकराची विनंति केली. शंकरानें इंद्राची ती विनंति मान्य केली व तो तत्काल आपणाबरोबर आपलें सैन्य घेऊन अमरावतीस आला. ४ शंकर व नंदी यांचा योग. शंकराबरोबर भूतभैरव वगैरे असंख्य सैन्य होतें. या सर्व सैन्याला घेऊन महादेव अमरावतीस आल्यावर त्यांनीं नंदीला पाहिलें व मोठ्यानें शंख वाजवून ● आपल्या सैन्याला तो नंदी मारून टाकण्याविषयीं सुचविलें. शंखध्वनि होण्या- चरोबर शिवगण नंदीवर आपआपल्या अस्त्रांचा भडिमार करूं लागले. कोणी मोठ- •मोठाल्या शिळा नंदीवर टाकू लागला, कोणी निकरानें बाण मारूं लागला, कोणी मुद्गल मारू लागला, कोणी त्रिशूल टोंचू लागला; याप्रमाणे जो तो आपआपले सर्व बळ खर्च करून नंदीला त्रस्त करूं लागला. शिवगणांचें तें कौतुक कांहीं वेळ सहन करून नंदीनें आपलें शैथिल्य सोडिलें, व तो कुद्ध होऊन एकवार त्यानें सर्व सैन्याकडे व महादेवाकडे अवलोकन केलें. नंतर त्यानें आपल्या दीर्घे पुच्छानें सर्व शस्त्रांचा प्रतीकार करीत करीत रणांगणावर चाल केली. नंदीचें तें प्रचंड शरीर जेव्हां शिवसैन्याकडे येऊं लागलें, तेव्हां पर्वताला पाय फुटून तो पर्वतच आपणाकडे चालत येत आहे असे शिवसैन्याला वाटलें. तो पर्वताप्रमाणे नंदी जेव्हां वेगाने धावूं लागला तेव्हां हजारों शिवगण त्याच्या नुसत्या शरिराच्या आघातानेंच मेले, कित्येक पायाखालीं तुडविले गेले, कित्येकांना नंदीने आपल्या शेपटीने बांधून दूर झुगारून दिलें, कित्येकांच्या हृदयांत शिंगे टींचून त्यांनां मारिलें. त्या नंदीचा हा विलक्षण पराक्रम पाहून शिवसैन्य भिऊन गेले व तें शिवाच्या आड लपूं लागले. महादेवांनांही नंदीची ती विलक्षण शक्ति पाहून मोठे आश्चर्य वाटले. मग महादेवानी हातांत धनुष्य घेऊन नंदीवर बाणांची वृष्टि करण्यास आरंभ केला. पर्जन्याच्या वृष्टीप्रमाणें नंदीवर बाण पडूं लागले, परंतु नंदीनें नुसता श्वास सोडिला कीं, ते बाण वान्याच्या जोराने झाडांचा वाळलेला पाला उडावा त्याप्रमाणे उडून जात. मग शंकरानी आपला त्रिशूळ व सुनाभ चक्र मोठया वेगानें नंदीवर फेंकून मारिलें, पण नंदीनें त्रिशूळ व चक्र आल्याबरोबर आ करून गिळून टाकिलें. आतां पुढे कोणत्या अस्त्राची योजना करावी या विचारांत महादेव आहेत तोंच नंदी महादेवांच्या अगदीं अंगाजवळ आला व धडक मारून त्यानें महादेवाला खाली पाडलें; आणि शिंगांनी उचलून एक योजन लांब फेंकून दिले. त्यावेळी महादेवाच्या कंठाला नंदीच्या शिंगा- मुळे काळा डाग पडला, म्हणून तेव्हांपासून शंकराला नीलकंट असें झगतान.