पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय १३ वा. ८३ चालत नाहीं असें पाहून एक सेवक इंद्राकडे आला व त्याला त्यानें झालेली सर्व हकीकत सांगितली. ती सर्व हकीकत ऐकून घेतल्यावर इंद्राला वाटले किं, हा कोणीतरी राक्षस उन्मत्त होऊन पशु रूपानें आपल्या बागेचा नाश कर- ण्यासाठीं आलेला आहे, अशी कल्पना करून इंद्रानें युद्धाची सर्व तयारी केली, व तो रणवाद्यांच्या गजरांत आपल्या नंदन वनांत आला. नंदनवनाचा तो नाश पाहून इंद्र अत्यंत संतप्त झाला व त्यानें आपल्या सैन्याला त्या उन्मत्त पशूला सहस्र खंड करण्यास सांगितले. इंद्राचा हुकूम होण्याबरोबर हजारों वीर आपली शस्त्रे नंदीवर चालवूं लागले. कोणी बाण सोडूं लागला, कोणी तलवार मारूं लागला, कोणी परशु मारूं लागला, कोणी गदेनें बडवूं लागला, कोणी त्रिशू- ळानें टोचू लागला, याप्रमाणे देवांनी शस्त्रप्रहारांचा नंदीवर सारखा वर्षाव केला, परंतु नंदीच्या शरिरावर त्या शस्त्रांचा कांहींच परिणाम झाला नाहीं. ज्या प्रमाणे सूर्य मेघमंडलाच्या आड येतो, त्याप्रमाणे नंदी बाणाच्या वृष्टीमुळे दिसेनासा झाला, परंतु नंदीला हे देव आपल्या अंगावर शस्त्ररूपी पुष्पे वाहून आपली पूजाच करित आहेत असे वाटलें. नंदीनें बराच वेळपर्यंत ती देवांची युद्धलीला सहन करून मग त्यांच्याकडे आपला मोर्चा फिरविला. व एक जोरानें श्वास सोडून त्या सैन्याला दशदिशांनां उडवून टाकिलें. कित्येकांनां मुखांत धरून दुखंड केले, कित्येकांनां शिंगावर घेऊन लांब झुगारून दिलें, मस्तकाची धडक मारून कित्येकांनां मारून टाकिलें, शेपटीला बांधून कित्ये- कांनां गिरिकंदरांत फेंकून दिलें; कित्येकांनां पायांखाली तुडविलें. तो त्या नं- दीचा पराक्रम पाहून इंद्राचे सैन्य अत्यंत भयभीत झालें. यक्ष, गंधर्व र त्या भीतीमुळे रणांतून पळून गेले, इंद्रालाहि नंदीच्या त्या विलक्षण शक्तीचा मोठा विस्मय वाटला, व तो अत्यंत क्रुद्ध होऊन नंदीवर बाण टाकू लागला. परंतु ज्या- प्रमाणें शिवपूजेच्या वेळी महादेवाला कमळें वहावींत त्याप्रमाणे ते बाण नंदीच्या पृष्ठभागावर पहूं लागले. तेव्हां इंद्रानें आपलें वज्र काढिले व नंदीच्या अंगावर त्वेषानें धावत जाऊन मारिलें. त्या वज्राच्या आघातानें नंदी मूर्च्छित पडला, व त्याच्या मुखांतून रक्त वाहू लागले; तें रक्त पूर्व दिशेकडे वहात जाऊन त्याचे लोखंड झाले. नंदीची ती मूर्छा तत्काल गेली व तोहि इंद्रावर अत्यंत क्रुद्ध झाला. त्यानें आपल्या शेपटीच्या एका झटक्याबरोबर इंद्राला बांधिलें, व इतकें लांब झुगारून दिलें कीं, तो कैलासांत जाऊन शंकराच्या सभामंडपांत आपटला. शंकर त्या वेळी तेथेंच बसले होते. सभामंडपांत एकाएकी कोणी येऊन पडल्याचे पाहून त्यांना मोठें आश्चर्य वाटलें. पडलेला पुरुष त्या विलक्षण आघातामुळे मूर्छित झाला होता, म्हणून शंकरांनी त्याला वारा घालून सावध केलें. इकडे नंदीनें इंद्रभुवनांत प्रवेश करून इंद्राचे रत्नखचित सिंहासन मस्त- काच्या आघाताने चूर्ण करून बापाची इच्छा पुरी केली, व तेथें जाँ रत्ने