पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पत रु. [ स्तबक 66 तला. आपल्या हातांत नेहमीं धारण करीन, व त्या शंखोदकानें मला स्नान घालून माझी जे पूजा करितील त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. ” विष्णूचें हें भाषण ऐकून नंदी प्रसन्न झाला व विष्णूला ह्मणाला; " हे वैकुंठपते ! माझा इतका सन्मान केल्यामुळे मी ही तुला प्रसन्न झालो आहें, तर तुझी जी इच्छा असेल तें माग,. मी ते तुला आनंदानें देईन,” तेव्हां विष्णूनें नंदीजवळ पीतांबर मागि- जो पीतांबर नंदीला अग्नीनें दिला होता, तो नंदीनें विष्णूला तत्काल अर्पण केला, व त्या वस्तूचा स्वीकार केल्याबद्दल संतोष दर्शविला. नंतर नंदी क्षीरसागराहून निघून आपला पिता जो शिखी ऋषि त्याच्याकडे आला व त्याला झालेले सर्व वर्तमान कथन केलें. ती हकीकत ऐकून शिखीला फार आनंद झाला व त्यानें नंदीला प्रेमानें कुरवाळिलें. मग नंदी पित्याला ह्मणाला; तात ! मी क्षीरसागराचें दूध तृप्ति होईपर्यंत प्यालों आहें, आतां तृणपल्लवें खाण्याची इच्छा झाली आहे, तर ती खाण्यासाठीं कोठें जाऊं तें 66 मला सांगा. " ८२ ३ सिंहासनच्युत इंद्र. व शिखी ह्मणाला; " नंदी ! तूं आतां अमरावतीस आ आणि तेथील इंद्राच्या जंदनवनांतील तुला वाटतील त्या तृणलतादि वनस्पती खाऊन टाक. " शिखीनें या प्रमाणें नंदीला सांगितल्यावर नंदी तत्काल आपल्या बापाला नमस्कार करून तेथून निघाला व अमरावतीस आला. नंदीला तें नंदनवन पाहिल्यावर मोठें समा- धान वाटले व त्यानें आपल्या शिंगानें त्याचा दरवाजा मोडून प्रवेश केला. तेथें तो हिंडत असतां वाटेंत जें जें आडवें येईल त्याचा तो नाश करूं लागला. अम- रावतीच्या त्या नंदनवनांतील जाई, जुई, चमेली, मोगरा, चांफा, द्राक्ष, केळी बगैरे अनंत फलपुष्पयुक्त लतावृक्षांचा नंदीने फार नाश केला. नंदी ह्मणजे साक्षात् अग्नीचा अवतार, तेव्हां त्यानें कितीही खाल्ले तरी त्याची तृप्ती होणे अशक्यच होतें. मनाला वाटेल ती फळे खावीत, पुष्पे खावत, लता खाव्यात, मधून मधून दांडगाई करावी, मोठमोठाले वृक्ष उन्मळून पाडावेत, असा त्या नंदीनें नंदनवनाचा नाश चालविल्यावर त्याच्या संरक्षणासाठी ठेवलेले सेवक बागेत गेले व तो काय प्रकार आहे ते पाहूं लागले. नंदीनें नंदनवनाची ती केलेली नासाडी पाहून ते इंद्रदूत अत्यंत क्रुद्ध झाले व नंदीला ताडण करूं लागले. कोणी दगड मारूं लागला, कोणी काठ्या मारूं लागला, कोणी चाबूक मारूं लागला, तथापि नंदीवर त्याचा कांहींच परिणाम होईना. पर्वतावर कापूस पडावा त्याप्रमाणें नंदी तें ताडण सहन करीत होता. आपला कांहींच इलाज होतें, ज्या शंखांतून त्या राक्षसाला बाहेर काढिलें तोच शंख विष्णु आपल्या हातांत बागवूं लागला.