पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.३ रा. .] अध्याय १३ वा. दांतावर गदा मारली. तेव्हां नंदीचे कांहीं दांत उडाले व ते सागरांत त्या दंतांपासूनच शंख उत्पन्न झाले. नंदीला गदेचा आघात · बरोबर नंदीजवळ जीं चवदा रत्नें होतीं तीं त्यानं समुद्रांत टाकून दिली. त्याने मुखांतून लक्ष्मी टाकिली, दक्षिण हस्तानें ऐरावताला टाकून दिलें, दक्षिण चरणानें सप्तमुखी घोड्याला टाकिलें, शेपटीच्या गोंड्यांतून कल्पतरु पडला, त्याच्या जिभेतून अमृत पडलें, डोळ्यांतून कौस्तुभ पडला, हृदयांतून चंद्र पडला, लिंगांतून कामधेनु पडली, घामांतून मंदिरा पडली, नाकांतून धन्वंतरी, शिंगांतून धनुष्य, तोंडाच्या फेसांतून विष, डाव्या पायांतून अप्सरा व डाव्या हातांतून दुर्दशा पडली. हीं चवदा रत्नें नंदीजवळ असण्याचे कारण असे होते किं, वरुणा- जवळ ती रत्ने देवांनी ठेवावयाला दिली होती, आणि नंदी हा वरुणाचा अधी अवतार असल्यामुळे ती नंदीजवळ होती. ती या प्रसंगी विष्णूच्या गदा प्रहारा- मुळे नंदीजवळून समुद्रांत पडली. राजा जनमेजया ! ही रत्ने पुढे समुद्रांतून कशी निघाली ती कथा तुला माहित आहेच. तसेंच नंदीच्या दांतातून जे रक्त समुद्रांत पडलें त्या पासून मासे कासव वगैरे जलचर प्राणी निर्माण झाले. त्या नंदीचे व विष्णूचे साठ दिवसपर्यंत युद्ध चाललें होतें, परंतु विष्णूला नंदी मुळींच आ- टोपेना; त्यांनें अगदी शिकस्त केली शेवटीं नंदीनें मस्तकाच्या धडकनें विष्णु भूमीवर पाडिलें व त्याच्या छातीवर तो उजवा पाय ठेवून उभा राहिला, तेव्हा विष्णु त्या नंदीला ह्मणाला; “ अरे ! तूं कोणाचा कोण आहेस तें मला सांग, मी तुला प्रसन्न झालों आहे. तुझी इच्छा असेल तें तुला देण्यास तयार आहे." • तेव्हां नंदी विष्णूच्या छातीवरून खाली उतरून ह्मणाला; 'मी शिखीऋषीचा पुत्र असून माझें नाव नंदिकेश्वर आहे." तो नंदीचा इतिहास ऐकून विष्णूनें त्याला • नमस्कार केला. तेव्हां नंदी विष्णूला ह्मणाला; "हे श्रीहरि ! तूं मला प्रसन्न झाला आहेस, तर माझे पालन कर, एवढेच मी तुजजवळ मागतों." मग विष्णु ह्मणाला; “नंदिकेश्वरा ! ही तुझी मागणी मी द्वापारयुगांत पुरी करीन. तूं गोवर्धन आदि अवतार ह्मणून मी तुझी पूजा करीन, आणि माझ्या हृदयावर तूं जो आपला दक्षिण चरण ठेविला आहेस, ती खूण मी आज पासून माझें भूषण असे मानीन; व त्या भूषणामुळे मी माझ्या शत्रूनां सहज जिंकीन. नंदिकेश्वरा! तूं शिखीऋषीचा पुत्र, तेव्हां तुझा अधिकार फार मोठा आहे, मजवर उपकार कर- ण्याच्या हेतूनेंच तूं येथें आला होतास, या स्मरणासाठी मो श्रीवत्सलांछन असें नाव धारण करितों, तुझ्या दातांवर गदा मारून ते मी पाडले याबद्दल मला फार वाईट वाटतें, परंतु या माझ्या प्रमादाबद्दल तुझ्या दातांपासून जे शंख उत्पन्न होतील त्या दशंखांची पूजा लोक माझ्या अगोदर करितील. त्या शंखाला मी ८१ पडले, झाल्या-

  • शंखासुराला मारले त्या वेळीं विष्णूनें हातांत शंख धारण केला, असे कित्येक

पुराणांत आहे, शंखासुर हें नांव त्या राक्षसाला तो शंखांत लपला म्हणून मिळाले