पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक "" त्या ल्यामुळे ब्रह्मदेवानें त्याचें नांव नंदिकेश्वर असे ठेविलें. याप्रमाणे ब्रह्मदेवानें नंदीचें नामकरण वगैरे केल्यावर तो सत्यलोकी निघून गेला. मग तो नंदी आपल्या चापाला ह्मणाला; " हे तात ! मला भूक लागली आहे तर पवित्र असा आहार द्या. तेव्हां ऋषीनें नंदीला क्षीरसागर दाखविला व त्यांतील दूध तुला वाटेल तितकें पी ह्मणून सांगितलें." त्याप्रमाणें नंदी क्षीरसमुद्रांत गेला व तेथील दूध पिऊं लागला. क्षीरसमुद्राचे संरक्षणासाठी जे विष्णु दूत होते, ते तो प्रकार पाहून नंदीवर अत्यंत कुद्ध झाले व त्यास ताडण करूं लागले; परंतु नंदी त्या सर्वांना आपल्या शक्तीनें दूर करून दूध पीत होता. त्या क्षीरसागरींचें दूध प्याल्यामुळे नंदीच्या शरीराच्या रंग पांढरा सफेत झाला. कितीहि ताडण केले तरी नंदी मुळींच ऐकत नाही, असें पाहून एक विष्णुदूत नंदीला ह्मणाला; "अरे वत्सा ! हा क्षीरसागर विष्णूचा आहे. यांतील दूध प्याल्याचें जर विष्णूला समजेल तर ते तुला क्षणार्धीत यमाकडे पाठवून देतील. तेव्हां तूं लवकर येथून आपल्या घरीं निघून जा. विष्णुदूताचें तें बोलणे ऐकूण नंदीला राग आला. व त्यानें दूताला धरून दूर वैकुंठांत झुगारून दिले. वैकुंठांत विष्णूपुढें तो एकाएकी येऊन पडल्यावर विष्णूला मोठे आश्चर्य वाटले. विष्णूनें त्या दूताला असें होण्याचें कारण विचारले, तेव्हां दूतानें झालेली सर्व हकीकत सांगितली. ती नंदीविषयींची हकीकत ऐकून विष्णूला मोठें आश्चर्य वाटले. त्यानां त्या नंदीचा फार राग आला व ते तत्काल क्षीरसमुद्राचे कांठी आले. प्रत्यक्ष विष्णु आले तरी नंदी निर्भयपणं दूध पीत होता. तो त्या नंदीचा दांडगेपणा पाहून विष्णूंनी नंदीवर बाण सोडण्यास आरंभ केला. एकामागून एक हजारों बाण सोडून विष्णु अगदी थकले, परंतु नंदीनें त्या बाणाकडे लक्षहि दिलें नाहीं. आकाशांतून पर्जन्यवृष्टि होत आहे असे वाटून त्याने एकदां आकाशाकडे पाहिले पण आका- शांत मेघ वगैरे कांहीं नसून आपल्या अंगावर काय पडत आहे हे पाहण्यासाठी तो इकडे तिकडे पाहूं लागला, तेव्हां विष्णु आपणावर बाण सोडीत आहेत असे त्याला दिसले. त्या बाणापासून नंदीला कांहींहि त्रास होत नव्हता; अंगावर गवत पडावें त्याप्रमाणे त्याला ते बाण वाटत होते. पण विष्णु बाण सोडून निष्कारण श्रम घेत आहेत असे वाटून त्याने मोठ्या जोरानें श्वास सोडला. त्याबरोबर विष्णु उडून वैकुठांत गेले ! नंदीने पुन्हां श्वास आकर्षण केला त्याबरोबर विष्णु नंदीच्या नाकांत शिरले. ज्याप्रमाणें माता मुलास पाळण्यांत घालून झोंका देते, त्याप्रमाणे नंदीकेश्वरानें आपल्या श्वासाबरोबर विष्णूस आकाशांत न्यावें व उच्छासा- बरोबर नाकांत आणावें. याप्रमाणे विष्णु क्षणांत वैकुंठांत तर क्षणांत नंदीच्या नासापुटांत, असे हेलकावे खाऊं लागले. उंच आकाशांत विष्णु उडाले झणजे ज्यांची विटंबना पहावी व हंसावे असा त्या नंदीनें क्रम चालविला होता. विष्णूला नंदीच्या ह्या कृतीबद्दल फार राग आला व त्यांनी उडतां उडतां नंदीच्या कथाकल्पत रु.