पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] 1 अध्याय १३ वा. ७९ लाला लागला. १ आशीर्वादाकडे तरी लक्ष कसें जाणार? शिखी ऋषीला इंद्रानें आपला असा अपमान केला याबद्दल मरणप्राय दुःख झालें, व त्याला इंद्राचा फार राग आला; परंतु इंद्राला योग्य शिक्षा लावण्याचें त्याच्या हाती कांही साधन नस- "ल्यामुळे तो खिन्न होऊन मुकाट्यानें अमरावतीहून परत आला. शिखीने इंद्राला त्याच्या उत्मत्तपणाबद्दल चांगले शसन केले पाहिजे असें ठरवून तो त्या प्रय ऋषीचा प्रयत्न म्हणजे तपश्चर्या हा होय. तो शिखी एका प्रशांत अरण्यांत आला व इंद्राला आपल्या सिंहासनावरून उचलून दूर फेंकून देईल अशा शक्तिशाली पुत्राची मनांत इच्छा धरून तपथ्र्यैला बसला. त्या ऋषांनें एक हजार वर्षे पर्यंत निरशन करून ब्रह्मचर्य प्रताने राहून धूम्रपान व पंचाग्निसाधन केल्यावर त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले व काय मागावयाचें असेल ते माग, म्हणून हाणाले. तेव्हां तो शिखीऋषि ह्मणाला; " हे ब्रह्मदेवा ! मला असा पुत्र दे, किं जो आपल्या पराक्रमानें इंद्राला जिंकून अमरावतीचें राज्य घेईल.” शिखीची ती मागणी ऐकल्यावर ब्रह्मदेव ह्मणाले, “ शिखी ! तुझे ह्मणण्याप्रमाणें तुला पुत्र होईल, परंतु इंद्राला चौदा मनुपर्यंत सिंहासन दिलेले आहे, तोपर्यंत अमरावतीचे राज्य दूसरे कोणाला मिळणार नाहीं, तथापि तुझा पुत्र इंद्राला जिंकू शकेल, असा मी तुला वर देतो." असे म्हणून ब्रह्मदेवानें शिखी ऋषीच्या मस्तकावर हात ठेविला, व त्याच्या शेंडीवर कांहीं मंत्राक्षता टाकिल्या. मंत्राक्षता टाकर्णे झाल्यावर, ब्रह्मदेव ह्मणाले; " शिखी ! तुला या शेंडीपासूनच पुत्र होईल. तो त्रिभुवन जिंकून इंद्र, शेपशाई भगवान् व महादेव यांच्यापेक्षांही पराक्रमी असा होईल." असे म्हणून ब्रह्मदेवानें वरुणाची प्रार्थना करून त्याच्याजवळून त्याची अर्धी शक्ति मागून घेतली, अग्नीजवळून तितकीच शक्ति मागून घेतली व वायूचीही प्रार्थना करून त्याची अर्धी शक्ति मागून घेतली. त्या तिन्हीं शक्ति एकत्र करून त्याचा पुतळा निर्माण केला व तो शिखी ऋषीच्या शिर्खेत ठेवून ब्रह्मदेव निघून गेला. २ नंदी व विष्णु यांचें युद्ध. ब्रह्मदेवानें सांगितल्याप्रमाणें शिखी ऋपीने आपली शेंडी सोडून झटकली, तो अत्यंत तेजस्वी असा वत्स भूमीवर पडला. तो चतुष्पाद पुत्र पाहून शिखी ऋषीला फार आनंद झाला. त्या वत्साच्या मस्तकाला सूर्याने दिलेला पीतांबर होता. तोंड लाल रंगाचे असून त्याचे डोळे इंगळाप्रमाणें तप्त होते, कमरेचा भाग सुवर्णा- प्रमाणे चमकत होता, त्याची अंगकांति मेघाप्रमाणे होती, मस्तकावर दोन शिंगे असून कटिप्रदेश एक पुच्छ होते. याप्रमाणें तो वत्स, शिखी ऋषीच्या शेंडींतून पडल्यावर ब्रह्मदेव तेथे आले व त्यांनी त्या वत्साचें नांव नंदिकेश्वर असें ठेविलें. नंदिकेश्वर असें नांव ठेवण्याचें कारण असें किं नकार ह्मणजे विष्णु, दकार झणजे अग्नि, आणि ककार हाणजे वरुण होय. अशा ह्या तीन देवांची मूर्ति अस