पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक प्रधानाला म्हणाली; " सुमते ! एकवार सती जाण्यासाठी निघालेल्या स्त्रियेने नगरांत प्रवेश करूं नये, असे शास्त्र आहे, तसेच प्रेतहि नगरांत नेतां येत नाहीं. म्हणून मी येथेंच या प्रेताचें संरक्षण करित वसतें, आणि तुम्हीं सर्वजण नगरांत परत जाऊन आपआपले व्यवसायाला लागा. त्या कोकिलेचे म्हणणें खरें होईपर्यंत भी येथेंच या प्रेताच्या सन्निध तपश्चर्या करित वसतें." प्रसूतीने असे सांगितल्या- वर सर्वलोक आपआपले घरी निघून गेले, व प्रसूती कलेवराजवळ बसून कलेव- रात्र संरक्षण व तपश्चर्या करूं लागली. ' १७८ अध्याय १३ वा. 2282 १ नंदिकेश्वरोत्पत्तिकथा. वैशंपायन ऋषि याप्रमाणे प्रसूतीची कथा सांगून जनमेजय राजाला म्हणाले; “राजा ! वीरभद्राच्या सैन्यानें दक्षप्रजापतीची कशी विटंबना केली हे तुला समजलेच आहे. आतां तुला पुढे दक्ष जिवंत कसा झाला तें सांगतों. वीरभ- द्राचें सैन्य अशा रीतीने विजय मिळवून कैलासास परत गेल्यावर वीरभद्रानें कसा पराक्रम गाजविला तें शंकरानां कथन केलें. तो सर्व इतिहास ऐकल्यावर महादेवांचे मनाला अत्यंत उद्विग्नता वाटू लागली. खऱ्या वीराला न शोभण्यासारखीं कांहीं कृत्यें त्या युद्धांत नंदी व वीरभद्र यांनी केल्यामुळे महादेवांनां त्या दोघांचा पुरा राग आला, व महादेव त्या दोघांनां सोडून दूर अरण्यांत निघून गेले, आणि मनाला समाधान वाटावें ह्मणून तपश्चर्या करीत बसले. " वैशंपायन ऋषि जनमेजय राजाला दक्षप्रजापतीची कथा सांगत असतां त्याला त्या नंदीची माहिती ऐकण्याची इच्छा झाली. तो वैशंपायन ऋपीला झणाला; "मुनीवर्य ! नंदी म्हणजे साधारण एक पशु, त्याच्या अंगी एवढी विलक्षण शक्ति होती व त्याचे प्रत्यक्ष ईश्वर जे महादेव त्यानीं एवढे संगोपन केलें होतें, या- बद्दल मला मोठें आश्चर्य वाटतें, तर या नंदीची उत्पत्ति कशी झाली तें मला आपण कृपा करून सांगावें. वैशंपायन ऋषि म्हणाले; " राजा! पूर्वी शिखी या नावाचा एक महातपोनिधि ऋषि होऊन गेला. तो एके दिवशीं इंद्रलोकी गेला व इंद्र राजवाड्याच्या महालांत बसला होता तेथें जाऊन उभा राहिला. तोपर्यंत इंद्राच्या सेवकांनी कांहींच सत्कार केला नाहीं, आणि इंद्रानेंहि त्या ऋषीकडे लक्ष दिले नाहीं. तो गंधर्वाच्या व अप्सरांच्या नाच गाण्यांतच गुंग होता, ऋषीने इंद्राला आशीर्वाद देऊन त्याचें आपणाकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला, पण इंद्रानें नुसतें त्याच्याकडे पाहिले देखील नाहीं. मग त्याच्या व