पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१लं. ] अध्याय ४ था. अध्याय ४ था. १७ १ मदन व शंबरासूर यांची कथा. हंसिणी म्हणाली; “प्रभावती, पूर्वी तारकासूर या नांवाचा राक्षस पृथ्वीवर फारच उन्मत्त झाला होता. त्याने सर्व त्रिभूवन जिंकून देव व दानव यांनां त्राहीभगवान् करून सोडलें होतें. त्यावेळी महादेव, दाक्षायणीनें देहत्याग केल्यामुळे, काम्यकवनांत जाऊन जपतप करीत बसले होते. तारकासुरानें ब्रह्मदेवाकडून असे वरप्रदान मिळविलें होतें कीं, शंकराचे पुत्रावांचून कोणा- कडूनहि मला मरण येऊं नये. असा वर मागण्याचें कारण, शंकर पुढें विवाह करणार नाहीत अशी त्याची खात्री झालेली होती. तारकासुराच्या जुलमानें तिहीं लोकींचे लोक त्रस्त झाल्यावर देवेंद्रास या तारकासुराचा नाश कसा करितां येईल याची मोठी काळजी पडली. देवगुरु बृहस्पति, यांनां विचारितां त्यांनी असे सांगितले की, शंकराचा पुत्र या राक्षसाचा नाश करील. पण शंक- रास पुत्र नाहीं, बरें होईल म्हणावें तर विधूर आहेत. तेव्हां ते लग्नास प्रवृत्त होतील अशी कांहीं तरी तजवीज केली पाहिजे. असा विचार करून देवेंद्र वगैरे मंडळी त्या उद्योगास लागली. हिमालयाची मुलगी उमादेवी, ही उप- वर झालेली असून फुले आणण्यासाठी नित्य काम्यक वनांत जात असे. ही संधी साधून इंद्राने मन्मथ वसंत यांस काम्यक वनांत पाठवून दिले. त्या दोघांनी शंकरास आपल्या तपश्चर्येपासून ढळवावयाचा प्रयत्न चालविला. महा- देवी पार्वती, ही स्वरूपानें फारच सुंदर असून उपवरावस्थेमुळे अधिक मनोहर दिसत होती. तिची इच्छा शंकरासच वरावें अशी होती. ती शंकराजवळ येऊन उभी राहिलेली असतांनां शंकरानी तिच्याकडे सहज डोळे उघडून पाहिले त्याबरोबर मन्मथानें उभयतांमध्ये कामवासना उत्पन्न केली, महादेवास पायें- तीचे स्वरूप पाहून तपश्चर्येचे विस्मरण झाले व ते कामातुर होऊन पार्वतीबरोबर बोलू लागले. पार्वतीनें, पाणिग्रहण करावें ह्मणून शंक- राची विनंति केली, ती शंकरानी लागलीच मान्य केली. शंकराची काही दिवसांनी अनुरागानें वाढलेली संतप्तता नाहींशी झाल्यावर त्यांस तपश्च- र्येचें स्मरण झालें, व त्याबद्दल फार अनुताप वाटु लागला. झालेला प्रकार कोणी तरी कपटानें केला आहे अशी त्यांची खात्री झाली व त्यामुळे तें कपट करणारावर महादेव फार रागावले. हे सर्व कृत्य मन्मथाचें आहे असे त्यांच्या लक्षांत आल्याबरोबर महादेवानी आपला तिसरा डोळा उघडून मन्मथास जळून टाकलें. मदनाची स्त्री रति हाणून होती, तिला आपला पति शंकरानें भस्म करून टाकला असे कळल्यावर त्या साध्वीच्या दुःखास सीमा उरली नाही. ती 'शंकराकडे येऊन मोठ्यानें हंबरडा फोडूं लागली. या वेळी महादेवाच राग