पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय १२ वा. तिनें हातांत नारळ घेतला व तो अमीत टाकिला, आणि स्वतः अमींत उडी टाकण्यासाठी तिनें आपले शरीर किंचित उचललें, तोंच तेथें एक कोकिला आली व ती आकाशांतून मोठ्यानें म्हणाली; “ हे प्रसूती ! तूं अग्निप्रवेश करूं नकोस, तुझा पति प्रजापति तुला लवकरच परत मिळेल, आणि माझे हे म्हणणें न ऐकतां तूं जर हट्टानें अग्निप्रवेश करशील, तर तुला आत्महत्येचं पातक लागून तूं अधोगतीला जाशील. तूं आपली मुलगी जी पार्वती हिच्या हातांत, ती तुला येऊन भेटली त्या वेळीं कांकणें घातली होतीस. जी साध्वी पार्वतीचें हातांत कांकणें घालिते, तिचे चुडे कधींहि भंग पावत नाहींत. च्या गौरीला ज्या स्त्रिया सौभाग्यतंतु झणजे गळसरी, कांकणें, कुंकुं, वगैरे अर्पण करितात त्यांचें सौभाग्य कधींहि जात नाही, त्याप्रमाणे तुझेंहि सौभाग्य नाहींस व्हावयाचें नाहीं. तसेंच यज्ञकर्माचे वेळीं पुण्याहवाचन झाल्यावर तूं मार्कडेय ऋषीला नमस्कार केलास त्या वेळींहि त्यांनी तुला सौभाग्यवती होशील असा आशी- वाद दिला आहे, तेव्हां तुझें सौभाग्य कधीहि नाहींसें होणार नाहीं." त्या कोकि- लेचें बोलणे ऐकून प्रसूती त्या दगडावर स्थीर झाली, ती कोकिलेला म्हणाली; " बाई कोकिले यावेळीं अस्खलित मनुष्य वाणीनें तूं जें कांहीं मला सांगितलेंस यावरून तुझी शक्ति कांही विलक्षण असून, तुझें म्हणणें खरें असावें, असें मला चाटतें. तथापि आम्ही अज्ञानी लोक असल्यामुळे तुझ्या बोलण्यावर एकाएकी विश्वास बसत नाहीं, जर तुझें म्हणणें खरें असेल, तर मी अग्नीत टाकलेला नारळ मला परत दे, म्हणजे मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवीन." प्रसूती असे म्हणाल्याबरोबर अमींतून नारळ बाहेर पडला. त्या नारळाला कोठें किंचित् अग्नीचा डाग देखील नव्हता. तो प्रकार पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले व त्यांचा कोकिलेच्या बोलण्यावर विश्वास बसला. प्रसूती कोकिलेला हाणाली; “बाई कोकिले ! तुझें म्हणणें खरें दिसतें. या प्रसंगी तूं ही गोष्ट सुचविलीस हे तुझे माझ्यावर अनंत उपकार झाले आहेत, मी तुझे उपकार कधींहि विसरणार नाहीं. मी तुझी सुवर्णाची मूर्ति करून तिची पूजा करीत जाईन. नदीच्या शीतळ पाण्यानें स्नान करीन, त्यादिवशीं निरशन करीन, ब्रह्मचर्य व्रतानें राहीन, आणि भूमीवर शयन करीन, ब्राह्मणांना बोलावून दानव्रतें करीन, कोकिले ! माझ्या प्रमा- णेंच ज्या स्त्रिया तुझें हें कोकिलाब्रत करितील त्यांच्या कपाळाचें कुंकुंहि कायम राहून त्यांनां संतती व संपत्ति प्राप्त होईल असें कर." प्रसूतीने कोकिलेची अशी प्रार्थना केल्यावर कोकीळा तेथून निघून गेली, नंतर आकाशांतून जोरानें पाऊस पडला व त्यामुळे भूमीवर पेटविलेली चिता क्षणार्धात विझून गेली. तो प्रकार पाहून सर्वांचा कोकिलेच्या बोलण्यावर अधिक विश्वास बसला. मग त्यांनी प्रजाप- तीच्या शरिरावरील चंदनाचीं लांकडे काढून टाकून, तें कलेवर भूमीवर काढिलें, आणि पाहतात तो अमीनें एक कैंसहि जळालेला नाही. मग प्रसूती सुमती