पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक असें वाटर्ते. आपणास मस्त्रमलशय्याहि घरी रुचत नसे, तीहि अंगास त्रासदायक होत असे, आणि आज आपणास ही कंटकमय वाळू आवडली काय ? अभ्यंग-- स्नान केल्यावांचून व अंगाला कस्तूरी लावल्यावांचून तुझाला झोप येत नव्हती, पण आज या रुधिराच्या स्नानानें कशी झोप लागली ! भूमीची शेज तयार करून आणि आकाशरूप वस्त्र पांघरावयाला घेऊन ही अखंड झोंप या दासीच्या कोणत्या अपराधामुळे रागावून घेत आहां ! ” या प्रमाणे प्रसूतीने त्या वेळीं शोक केला, परंतु कितीहि दुःखोद्गार काढिले तरी त्यामुळे झालेल्या प्रकाराचा कांहींच प्रतिकार होणारा नसल्यामुळे तिनें अज्ञानी जनाला शोभणारें कृत्य संप- विलें, व ती पुढील तयारीला लागली. प्रधानाला तिनें सूचना केल्याबरोबर सुमति प्रधानानें, त्या प्रेताला क्षिप्रा नदींत स्नान घालून स्वच्छ केलें, व त्याला चंदन लावले. प्रसूतीनेंहि स्नान केले व प्रेताला अग्निसंस्कारासाठी ती जागा शोधूं लागली. ती सुमति प्रधानाला ह्मणाली; " सुमते, माझ्या पतीचें या वाळवंटांत दहन करणें हैं मला प्रशस्त वाटत नाहीं, तर जेथें माझ्या पतीचें शिर वीरभद्रानें जाळले, त्याच यज्ञकुंडाजवळ दहन क्रिया करावी असे मला वाटतें. " सुमति व इतर लोकांनां प्रसूतीचें तें ह्मणणे पसंत पडलें, व त्या प्रमाणे त्यांनी दक्षाचें प्रेत यज्ञमंडपांत यज्ञकुंडाजवळ नेऊन ठेविलें. कथाकल्पतरु. इकडे दक्षाच्या प्रेताच्या दहनाची या प्रमाणे तयारी चालली असतां, तिकडे शार्ङ्गधरानें तो सर्व प्रकार अंतरदृष्टीने जाणून, मेघाला बोलाविलें व त्याला तो ह्मणाला “ हे मेघा ! दक्षप्रजापति हा माझा परमप्रियभक्त आहे, त्याला आतां चितेवर ठेवितील, तर तूं सावध राहून, काष्ठांनां अग्नि लाविल्याबरोबर पर्जन्य- वृष्टि कर, व चिता विझवून टाक. जर त्याच्या शरिरावरचा अनीमुळे एक कैंस जळेल तर मी तुला शाप देईन. " 1 ४ कोकिला कथन. प्रसूतीच्या सेवकांनी सर्व तयारी केल्यावर यज्ञकुंडाजवळ काष्ठे एकावर एक रचून चिता तयार केली. प्रेताला त्रिपुंडू लाविले, गळ्यांत तुळशीच्या माळा घातल्या, व जवळ धर्मशिळा आणून ठेविली. याप्रमाणे सर्व प्रकारची तयारी चालली आहे तो वर आकाशांत मेघ उत्पन्न झाले व त्यांचा गडगडाट सुरू झाला. इकडे वेदमंत्रांच्या घोपांत दक्षाचें प्रेत उचलले व तें चितेवर ठेवून वर चंद- नाची वगैरे लांकडे ठेविलीं, आणि त्यास अग्नि लावून दिला. त्यावर तुपाची धार धरल्यावर तो अनि अधिक प्रदीत झाला. अग्नि चांगला प्रदीप्त झाल्यावर प्रसूतीनें पश्चिम दिशेला शिला ठेविली व त्या चितेला झणजे पति, यांग व अग्नि अशी तिघांनां प्रदक्षिणा घालून ती त्या शिळेवर उभी राहिली. भूमि व सूर्य यांस तिनें वंदन केले. नंतर ती हात जोडून ह्मणाली; " हे दक्षप्रजापति !. जन्मोजन्मी तूंच मला पति मिळावास अशी माझी इच्छा आहे. " असें ह्मणूक