पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय १२ वा. ७५ ´णाली; “सुमते ! तुझे ह्मणणे खरे आहे, परंतु स्त्रीयांनी राज्य करणे ही एकप्रका- रची विटंबना होय. भ्रतारावांचून स्त्रियांची कांहींहि शोभा नाहीं. नदीचे पाणी संपल्यावर बंधाऱ्याचा जसा उपयोग नाहीं, सूर्य मावळल्यावर छत्रीचा जसा उपयोग नाहीं, त्याचप्रमाणें पति निवर्तव्यावर स्त्रियेनें जिवंत राहण्यांत कांही अर्थ नाही. स्त्री गरोदर असेल अथवा पुत्र लहान ह्मणजे मातृस्तनाचे पान करणारा असेल तर त्याच्या संरक्षणासाठी स्त्रीनें रहावें, असें धर्मशास्त्र आहे. पण मला तर पुत्र चगैरे कांहीं नाहीं, तेव्हां हैं जड शरीर निष्कारण ठेवण्यांत कांही अर्थ नाही. या राज्याची व्यवस्था तूं पहाव या प्रजेचें संरक्षण तूं कर, तूं आमचा धर्मपुत्र आहेस. तुझ्या स्वाधीन मी हें सर्व राज्य केले आहे. आतां अधिक वेळ घालविण्यांत अर्थ नाहीं. मी आपल्या पतीला केव्हां जाऊन भेटेन असे मला झालें आहे, तर सती जाण्याची तयारी लवकर करा." ३ प्रसूतीचा शोक. प्रसूतीचा निश्चय कांहीं केल्या ढळत नाहीं असे पाहून सर्वांनी तिच्या त्या कृत्याबद्दल अनुमति दर्शविली. मोठ्या थाटाची अशी सतीची तयारी केली. शुभ्र रंगाची उत्तम अशी घोडी आणून त्या घोडीला प्रसृतीनें वंदन केले व तीवर ती बसून रणक्षेत्राकडे निघाली. पुढे वाद्ये वाजूं लागली, मागें प्रधान वगैरे मंडळी सतीचें साहित्य घेऊन चाढू लागली, नगरवासी लोक त्या प्रत्यक्ष अंबिकेचें दर्शन घेऊं लागले, कोणी तिच्यावर फुले तुळसी उधळू लागले, तर कोणी तिची खणानारळांनी ओटी भरूं लागले. धन्य प्रसूती, धन्य तिचं धर्माचरण, आणि धन्य तिची पतिभक्ति परायणता, असा तिचा सर्वत्र जयजयकार होऊं लागला. नगराच्या बाहेर निघाल्यावर तिनें आपणाबरोबर जरुरीपुरते लोक घेतले व बाकी नगरवासी प्रजाजनांनां मोठ्या प्रेमानें परत लाविलें. मग ती प्रधान वगैरे बरोबरच्या लोकांसह रणांगणावर आली व तेथे आपल्या पतीच्या धडाचा शोध करूं लागली, तेव्हां तें तिला क्षिप्रा नदीच्या वाळवंटांत पडलेलें सांपडलें. आपल्या पतीचें धड वाळवंटावर पडलेले असून शरिराखाली रक्त सांचलें आहे, घोट्यापर्यंतचे पाय पाण्यांत बुडाले आहेत, असे ते पतीचें धड दृष्टीस पडल्याबरोबर प्रसूती घोडीवरून उतरली व धांवत धांवत जाऊन तिनें त्या धडाला इटालिंगन दिलें. पतीच्या दर्शनाबरोबर प्रसूतीचा चेहरा अत्यंत प्रभावशाली असा दिसूं लागला. तिने त्या धडाला वंदन केल्यावर तिचें हृदय दुःखानें भरून आलें, व तिच्या डोळ्यांत अश्रु दिसूं लागले. तिनें आपल्या डोळ्यांतले अश्रु पुसले व ती हाणाली; " अहो ! दक्ष प्रजापति महा- राज ! प्रजवर आपले इतकें प्रेम असून आज या दासीला मागे ठेवून एकटेच आपण स्वर्गात कसे गेलां ! आपणाविषयीं एकपत्नीव्रताबद्दल मी मोठा अभि- मान बाळगीत असे, पण आज आपणास मजपेक्षां स्वर्गोगना अधिक रुचली