पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक 66 वरील केश पाठीवर मोकळे सोडून दिले, भांगांत शेंदूर भरला, डोळ्यांत काजळ घातलें, कपाळाला कस्तूरी लावून वर कुंकुमाचा टिळक. लाविला, हातापायाला हळद लावून पायांत जोडवी घातली, अशा प्रकारें प्रसूतीने तो वेष धारण के त्यावर तिची मूर्ति अत्यंत करुणामय दिसूं लागली. नगरवासीलोक, प्रधान, सैनिक, मुली, वगैरे सर्वांचे डोळे अश्रूंनी भरून आले. प्रसूतीला त्या संबंधाने प्रति- बंध करावा असे प्रत्येकाला वाटू लागले. परंतु तसे करण्याचे कोणासच धैर्य होईना. सर्व तयारी झाल्यावर प्रसूति लोकांच्या उद्विग्न मुखाकडे लक्ष न देतां राजवा- ड्याच्या बाहेर पडूं लागली तेव्हां मात्र तिच्या मुलींनां स्वस्थ बसवेना. त्यांनी आपापली मुले प्रसूतीच्या पायावर लोटिलीं, व आपणहि मार्गात आडव्या पडून मोठ्यानें आक्रोश करूं लागल्या. एक मुलगी हाणाली; " आई ! बाबानें आ झाला सोडून जाऊन उघडें केलें आणि आतां तूंहि आह्नांला दूर लोटून निघून जात आहेस, मग आह्मी आतां आश्रय तरी कोणाचा करावयाचा ! आह्मांला तुझ्या वांचून आतां कोण आहे ? आह्मी 'आई' अशी कोणाला हाक मारणार ! आह्मांला प्रीतीनें जवळ बोलावून आमचे कुशल कोण विचारणार ! आई ! तूं या वेळी आमच्या डोळ्यांतील अश्रू पुसावयाचे, पण तें तूं सोडून देऊन आह्मांला दुःखसमुद्रांत बुडवित आहेस. आई! आह्मांवर दया कर, निदान या आमच्या चालकांसाठी तरी सती जाऊं नकोस." हे ऐकून प्रसूती ह्मणाली; "मुलींनो ! तुझीं प्रजापती सारख्या शूर वीराच्या मुली आहांत, हें या दुःखकारक प्रसंगांत विसरूं नका. प्रजापतीची स्त्री प्राणाचा मोह धरून सती गेली नाही, असे पुढे लोक ह्मणतील तें ऐकण्याची माझी इच्छा नाही. तसेच आपली आई सती जात असतां तिची पाठवणी न करितां तिला अडविणाऱ्या मुलीहि लो- कांच्या निंदेला पात्र होतील हैं लक्षांत ठेवा.” प्रसूतीने असे सांगितल्यावर सर्व मुलीनीं आपआपले दु:ख आवरून धरिलें व आईने सांगितल्याप्रमाणें तिची पाठवणी करण्यास त्या तयार झाल्या. पुढे प्रसूति राजवाड्याच्या अंगणांत आल्यावर तेथें सुमति प्रधान प्रजाजनांनां घेऊन उभा होता. तो प्रसूतीच्या चरणावर मस्तक टेऊन अश्रू गाळू लागला. तो रडत रडत ह्मणाला; “राणीसाहेब ! आपण आपल्या कन्यांचें समाधान केलेत, पण या आपल्या प्रजेला कोणाच्या स्वाधीन करून चाललांत; या प्रजेला तर आपणावांचून कोणीही नाही. आपल्या सती- जाण्यास प्रतिबंध करावा अशी माझी इच्छा नाही, परंतु या प्रजेला कोणी त्राता नाही, याचा आपण कांहींच विचार केला नाहीं; आपण या सर्व प्रजाजनाच्या मातुश्री आहांत, यांनां उघडे टांकिल्लास मार्गे अनर्थ होतील, याचा विचार करा; एकवेळ पुत्र कन्यांची अवहेलना केली तरी चालेल, परंतु प्रजेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यांचे प्रतिपालन न करितां आपण सती गेल्यास हे पाप आपल्या शिरावर तसेंच राहील;" सुमति प्रधानाचें हें भाषण ऐकून प्रसूती हो-