पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. रा. ] अध्याय १२ वा. - तांकडे पाहू लागल्या. एक राजदूत मोठ्या कष्टानें अश्रू गाळित आर्त स्वरानें ह्मणाला; "राणीसाहेब ! आपल्या कानावर एक अत्यंत अशुभ वार्ता घालण्या' सार्टी आह्मीं आलो आहोत; ती दुःखकारक बातमी सांगण्यास जीभ हालत नाही, परंतु सांगितल्या वाचूनहि इलाज नाहीं; त्या वीरभद्रानें दक्षप्रजापति महा- राजांनां मलयुद्धांत चित केलें; तो निर्दय शस्त्रांनी त्याचें मस्तक कापूं लागला पण तें कापेना, ह्मणून त्यानें तें पिळवटून तोडलें व यज्ञमंडपांतील यज्ञ- कुंडांत टाकून दिलें. अशा रीतीनें दक्षप्रजापति महाराज आपणा सर्वांनां सोडून परलोकीं गेले. " त्या राजदूतांनी ही अशुभ वार्ता, राणी व राजाचा अन्य परि वार, यांच्या कानावर घातल्यावर त्या राजवाड्यांत जो आकांत उडाला त्याचें वर्णन करणें अशक्य आहे. राणी शोकविव्हल होऊन दुःखाने वेडी झाली. तिला काय करावें हें सुचेना, परंतु आतां सर्व जबाबदारी आपणावरच आहे, आतां सर्वांची समजूत आपणासच केली पाहिजे, असा विचार करून त्या धैर्य शाली स्त्रियेनें एकदम आपले दुःख गिळून टाकिलें, आणि ती आपल्या कन्यांची समजूत करूं लागली. बापाच्या मृत्युमुळे त्या सर्व मुली व तो एकंदर परिवार त्या दुःखभारानें जेव्हां आक्रोश करूं लागला, तेव्हां तो शोकस्वर आकाश- मंडळ भेदून स्वर्गात प्रजापतीचे कानावरच जात आहे किं काय, असे वाटू लागलें. त्या मुली तर अनी वसुंधरेला अभिषेकच करित होत्या. मस्तकावर ताडण करून त्या प्रजापती प्रमाणेच आपले मस्तक नाहींसें करीत आहेत किंवा काय असे वाटू लागलें. प्रसूतीला त्या सर्वांची समजूत करितां करितां पुरे होऊन गेलें. मोठ्या कष्टानें सर्वांना शांत करून ती ह्मणाली, उत्पत्ति आणि मरण ही या शरीराला आहेतच, मरण हें जीवांची प्रकृति ह्मणजे मूळ व उत्पत्ति ह्मणजे जीवांची विकृति ह्मणजे विकार आहे, याकरितां त्याबद्दल हर्ष किंवा शोक करणें हें अज्ञ जनाचें काम होय. असो, झालें तें झालें. परमेश्वराला जी गोष्ट आवडली त्याबदल खेद न मानतां मला आतां पुढच्या तयारीला लागले पाहिजे. शरीराचा जो योग्य उपयोग करितो तोच जन्माला आल्याचे सार्थक करितो; त्या प्रमाणे माझ्या पतीनें रणांत केवळ यज्ञयागासाठी आपला देह गमावून आपल्या देहाचें सार्थक करून घेतलें आहे. तेव्हां मलाही सतीच्या धर्माप्रमाणे पतीबरोबर सहगमन करून या शरीराचा योग्य असाच विनियोग केला पाहिजे. २ प्रसूतीचा निश्चय. प्रसूतीनें आपला मनोदय स्पष्टपणे सर्वांना कळवून कोणाच्या पसंती ना पसं- तीकडे लक्ष न देतां तिनें स्वतःच सतीची तयारी चालविली. पाणी आणवून तिनें प्रथम स्नान केलें, नंतर ज्या सुताच्या पातळाचे कांठ व पदर हळदीच्या रंगानें पिवळे केले होते असें वस्त्र ती नेसली. व तशाच पिंवळ्या वस्त्राची तिने अंगांत चोळी घातली, गळ्यांत गळसरी बांधली, हातांत कांकणे भरलीं, मस्तका-