पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ कथाकल्पत रु.. [ स्तबक मस्तक कायम असून शरीर हवनासाठी नाहींसें झालें होतें. असो, म वीरभद्रानें सर्व दक्षसैन्याला सोडून दिले व तो रणवाद्यांच्या गजरांत मोठ्या समारंभानें कैलास पर्वतावर निघून गेला. " अध्याय १२ वा. १ प्रसूतीचा अग्निप्रवेश. दक्षप्रजापति रणांत पडल्यावर त्याचे राहिलेले सैनिक रणांगणावरून पळाले व राजवाड्यांत निघून आले. त्या दक्षप्रजापतीचा परिवार मोठा होता. प्रसूती नावाची त्याची स्त्री असून, त्याच्या एकूणसाठ मुली व त्या मुलींचे कन्यापुत्र वगैरे त्याच्या परिवारांत अनेक लोक होते. ती स्त्री व त्या मुली वगैरे रणक्षेत्रा- वरून काय बातमी येते वाची अगदी वाट पहात बसल्या होत्या. मनुष्याच्या स्वभावधर्माप्रमाणे मन चिंती तें वैरी न चिंती, याप्रमाणे त्यांच्या मनांत त्या युद्धाविषयीं अनेक विचार घोळत होते, या सर्व अनर्थाचें मूळ त्या मुलींनी दाक्षायणीला दरिद्रावस्थेत पाहून तिची अवहेलना केली होती हे होतें. तो विचार त्या मुलींच्या लक्षांत आला ह्मणजे त्यांनां अगदी मरणप्राय दुःख होत होते. आपल्या पित्याच्या सैन्याचा, द्रव्याचा, काळाचा, व स्वतःच्या शरीराचा दुरुपयोग केवळ आपण दाक्षायणीचा मानभंग केला ह्मणून होत आहे, तेव्हां पित्याला अशा रीतीनें त्रास देण्यास आपण कारणीभूत झालो आहों, हे त्या मुलांच्या क्षणोक्षणी मनांत येऊन त्यांनां फार वाईट वाटत असे. अशाप्रकारें दक्षप्रजापतीचा परिवार काय होते आणि नाहीं, या फिकिरींत असतां राजवाड्यांत एकाएकी रणक्षेत्रावरून कांहीं राजदूत पळून आले. ते काळवंडलेले, चेहरे दुःखी असलेले, वाड्यांत पाऊल टाकल्याबरोबर डोळे अश्रूंनी भरून आलेले असे राजदूत पाहिल्यावर त्या मुलींची अंतःकरणें चर्र होऊन गेलीं, व आका- शांत मेघांचें तुफान चाललें असतां वरून वीज पडण्याची जशी भीति वाटते त्याप्रमाणे आतां आपल्या कानावर कांहीं तरी अशुभ वार्ता पडणार, अशी त्यांनां भोति वाटू लागली; ते सैनिक मोठ्या कष्टानें एकेक पाऊल टाकित टाकित दुःखभानें क्लांत होऊन मध्येंच थबकत थबकत जेथे राणी बसली होती तेथें आले. त्यावेळी तो राजाचा एकंदर परिवार पाहून त्या दूतांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहूं लागल्या आणि त्यांच्यापैकीं, कोणाच्याच तोंडांतून एक शब्दही निघेना. अशा स्थितीत असलेले ते राजदूत आपणास कोणती बातमी सांगणार याचें अनु- मान प्रसूतीला व त्या राजकन्यांना सहज करितां आलें. त्यांची हृदयें दुःखान दाटून आली, डोळे अधूनी भरून आले, आणि त्या हताश दृष्टीनें राजदू- , ू