पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय ११ वा. ७१ पोषाक रक्तवर्णाचा होऊन मुखहि रक्ताने लाल झाले होतें. एका हातांत दक्षाचें शिर असून दुसरे हातांत रक्ताने भरलेली कट्यार होती. अशी ती वीरभद्राची भयंकर मूर्ति पाहून सर्वांची हृदये थरथर कांपूं लागलीं. दक्षप्रजापती मेल्याबरोबर सर्व शिवसैन्याला मोठा आनंद झाला. भुर्ते आनंदाने नाचून रणक्षेत्रांवरील मांसाचा चिखल एकमेकांच्या आंगावर फेंकित होतीं, दुंदुभी वाजत होत्या, जयजयकारानें आकाश दुमदुमून गेले होते, त्यावेळी वीरभद्र आपणाबरोबर आपले सैन्य घेऊन वाद्यांच्या गजरांत मोठ्या थाटानें दक्षप्रजापतीच्या यज्ञमंडपांत आला. तेथे यज्ञकुंड प्रदीत असून कांही ब्राह्मण त्या यज्ञकुंडांत आहुत्या देत होते, पण ती वीरभद्राची विलक्षण मूर्ति व तें त्याचं प्रचंड सैन्य पाहिल्याबरोबर ते ब्राह्मण यज्ञमंडपाच्या बाहेर पडून वाट फुटेल तिकडे पळत सुटले. परंतु झोटिंग जखिणी त्यांनां आडव्या झाल्या व त्यांनी त्यांची अत्यंत विटंबना केली. त्या त्यांच्या मस्तकावर बसून त्यानां चावूं लागल्या, त्यांची वस्त्रे फाडिलीं, पात्र फोडून टाकिलीं, आणि परिधान केलेली वस्त्रे सोडून घेऊन ती दूर झुगारून दिली, इकडे यज्ञमंडपांत यज्ञाजवळ वीरभद्र दक्षाचे शिर घेऊन बसला, व त्यानें भग्नवी- राला पुढे बोलावून तो त्याला ह्मणाला, "नीचा! या सर्व प्रकारास मूळ तूं आहेस. दक्षप्रजापतीला पाहून महादेव उभे राहिले नाहीत, ह्मणून तूंच दक्षाला खुणावून चिथविलेंस, ज्या डोळ्यांनी तूं खुण केलीस ते तुझे डोळे काढून त्याची प्रथम यज्ञकुंडांत आहुती देतों. असें ह्मणून वीरभद्राने दूताकडून भग्नाचे डोळे काढिले व ते यज्ञकुंडांत टाकून दिले. नंतर भृगु ऋपीला त्याचप्रमाणें बोलून त्याच्या दोन्हीं मिशा काढल्या व यज्ञकुंडांत टाकून दिल्या. जे ब्राह्मण शंकराची विटंबना पाहून हांसले होते, त्यांचे दांत पाडून ते यज्ञकुंडांत टाकून दिले. नंतर दक्षप्रजापतीचे शिर टाकिले. याप्रमाणे त्या यज्ञाची दुर्दशा झाल्यावर यज्ञकुं- डांतून यज्ञपुरुष हरिणाचें रूप घेऊन बाहेर पडला व तो तेथून पळू लागला. त्याला धरण्यासाठी शिवसैन्य त्याच्यामागे लागले होतें, परंतु त्यानें मार्गात बद्रिका पर्वत टाकून दिला. पुढे वीरभद्रानें यज्ञमंडपाला आग लावून दिली व तो इंद्रवरुणादि देवांजवळ हविर्भाग परत मागूं लागला. देवांनी त्याचा तो पराक्रम पाहून मुकाट्यानें आपआपले हविर्भाग त्याच्या स्वाधीन करून आपली सुटका करून घेतली. यज्ञकुंडांतून यज्ञपुरुष निघून गेल्यावर भूतांनी मलमूत्रांनी ते यज्ञाचे अग्नि विझवून टाकिले, नंतर वीरभद्र रणक्षेत्रावर आला व त्यानें आपल्या अंगांतील रक्त रणक्षेत्रावर शिंपून दोन्ही सैन्याचे वीर जिवंत केले. हे वीर जिवंत होण्याचे कारण असे होते किं, वीरभद्राच्या शरीरांत सर्व अमृत होतें. त्यावेळी फक्त दक्षप्रजापति व यज्ञाचा बोकड हे दोघे सजीवन झाले नाहीत; कारण दक्षाचें शिर यज्ञकुंडांत जळाले होतें व आहुतीसाठी आणलेल्या बोकडाचे