पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तवक फोडित जातो त्याप्रमाणें वीरभद्र, दक्षसैन्यांतील वीरांची डोकी उडवीत उडवित प्रजापतीजवळ येऊन थडकला, आणि त्यानें दक्षाचा रथ उलथून पाडून त्याला स्थाखाली आणि त्याबरोबर दक्षानें वीरभद्रावर सात बाण टाकून वीरभद्राला घायाळ केले. त्या बाणघातामुळे वीरभद्राच्या शरीरांतून रक्त बाहेर पडून तो अरण्यांतल्या फुललेल्या पळसाप्रमाणें लाल दिसूं लागला. वीरभद्र मोठ्या त्वेषानें त्रिशूळानें प्रजापतीला मारित होता, पण प्रजापतीचे शरिरावर शस्त्राचा एक व्रणहि वटेना. मग वीरभद्रानें शंकराची स्तुति करून प्रजापतीवर अग्नि- चक्र टाकिलें, तं विजेप्रमाणे भयंकर चक्र प्रजापतीकडे येण्याबरोबर प्रजापतीनें पर्जन्यास्त्र सोडून त्या अग्निचक्राची गति खुंटवून टाकिली. तेव्हां वीरभद्रानें वायव्यास्त्र सोडिलें, ते अस्त्र सुटण्याबरोबर प्रलयकाळच्या वान्याप्रमाणें भयंकर वारा सुटला व दक्षावर दगडधोंडे व वृक्ष यांची वृष्टि होऊं लागली, परंतु इतक्यांत दक्षानें पर्वतास्त्र निर्माण करून वायव्यास्त्राची गति खुंटविली. प्रजापती, याप्रमाणे तोडीला तोड भिडवित आहे, असे पाहून वीरभद्रानें शस्त्रास्त्रे टाकून दिली, व तो दक्षाबरोबर मल्लयुद्ध करूं लागला. दोघेहि सारखे शक्ति- संपन्न असल्यामुळे कोणीहि हार जाईना. एकदां तर दक्षानें वीरभद्राला आपल्या आंगाखाली घातले होते, पण मोठी चपलता करून वीरभद्रानें तो पेंच सोडविला, व त्यानें दक्षाला आपल्या आंगाखाली घातलें. वीरभद्र त्याच्या विशाल छातीवर बसून त्याला जोरानें बुक्या मारूं लागला, परंतु त्याचा प्रजापतीवर ांहींच परिणाम झाला नाहीं. मग वीरभद्रानें कमरेची कट्यार काढून तिनें तो दक्ष प्रजापतीचा कंठ कापूं लागला, परंतु दगडावर हत्यार जसे बोथट होते, त्या प्रमाणे ती सुरी निरुपयोगी होऊन, दक्षाचें मस्तक चक्राप्रमाणे गरगर फिरूं लागले! त्या विलक्षण प्रकारामुळे वीरभद्र अत्यंत विस्मित झाला. त्यानें मस्तक कापण्यासाठी अनंत उपाय केले, परंतु एकहि लागू पडेना, मग वीरभद्राचे असे लक्षांत आले किं, याच्या उदरांत अमृत असल्यामुळे हा मरत नसावा; तेव्हां वीरभद्रानें पायाच्या भारानें त्याचें हृदय दाबून धरले व नंतर दोन्ही हातांनी प्रजापतीचें शिर पिळवटून धडापासून उपटून काटिलें. ७० कथाकल्पतरु. .. → ३. यज्ञकुंडांत दशिराची आहुति. याप्रमाणें वीरभद्रानें तो प्रतापशाली वीर दक्ष मारल्यावर दक्ष सैन्यांत एकच हाहाःकार उडाला. दक्षवीर अश्रु गाळित गाळित रणांगणावरून पळून गेले, त्यावेळीं रणक्षेत्रांत वीरभद्राची मूर्ति अत्यंत भयप्रद अशी दिसत होती. दक्षप्रजा- पतीचें मस्तक पिळवटून उपटल्यामुळे दक्षाचे शरिरांतून रक्ताचे फवारे उडाले, व त्यामुळे वीरभद्र रक्तगंगेत स्नान केल्याप्रमाणे दिसूं लागला. मस्तकावरील कृष्ण वर्णाचे केस रक्ताने लाल होऊन ते त्याच्या पाठीवर पडले होते. त्याचा सर्व