पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] " प्रजापते ! तूं युद्ध- मला जर सोडतों." हें दक्षाचें बोलणें ऐकून वीरभद्र म्हणाला; विद्येपेक्षां बोलण्यांतच अधिक कुशल आहेस असे मला वाटते. प्राणाचा मोह असता तर मी इतक्या लांब आलोच नसतों, प्राणाचा मोह सोडून मग भी युद्ध साठी आलो आहे. कदाचित् युद्धांत मला तूं जिंकल्यास, राज पोरावर जय मिळविल्याबद्दल तुला कांही मोठीशी धन्यता वाटणार नाही. परंतु जर मी तुला जिंकिलें तर तुझ्या विटंचनेला पारावारहि उरणार नाहीं, तेव्हां ती विटंबना होऊं नये अशी इच्छा असल्यास शंकरांनां हविर्भाग देऊन मुकाट्यानें परत जा, अथवा तसे करावयाचें नसल्यास, बोलण्यांत वेळ न घाल- वितां एकदम युद्धास आरंभ कर. सावध ऐस माझे वीर तुझ्यावर आक्रमण करितील त्यांचें निवारण करण्याचा प्रयत्न कर, बेसावध राहून व्यर्थ प्राण गमावूं नकोस." अध्याय ११ वा. कैलासपति महादेवांचा जटानंदन जो वीरभद्र त्यानें याप्रमाणे दक्ष प्रजा- पतीला आव्हान करून, आपले शिवधनुष्य आकर्ण ओढिलें, व महाशक्ति प्रजापतीवर सोडिली, परंतु प्रजापतीने त्या शक्तीचे निवारण न करितां पर्वता- प्रमाणे स्थिर उभा राहून त्यानें ती महाशक्ति लीलेने सहन केली. प्रजापतीची ती विलक्षण शक्ति पाहून वीरभद्र थक होऊन गेला. मग त्यानें दोनहजार बाण मोठ्या क्रोधानें दक्षावर सोडले, पण दक्षानें तत्काल ते बाण तोडून, वीर- भद्राचे रथावर त्यानें सात बाण सोडिले, वीरभद्र त्या बाणांचें निवारण करणार क्यांत ते बाण रथावर आदळून वीरभद्राचा सारथि व घोडे निरुपयोगी झाले. त्यानंतर पुन्हां आठ बाण सोडून प्रजापतीनें वीरभद्राचा रथ मोडून टाकून वीरभद्राला रथाखाली आणिलें वीरभद्राच्या रथाचा नाश झाल्याबरोबर शिव- सैन्यांत हाहा:कार उडाला व दक्षसैन्य जयजयकार करित वीरभद्राचे अंगावर धावून आलें. परंतु वीरभद्राच्या सैन्याने त्या वेळी दक्षसैन्यावर जोराचा हल्ला केला व हजारों दक्षाचे वीर कापून काढिले. दोन्हीं सैन्यें निकरानें लहूं लागली, शेंकडों वीर प्रत्येक क्षणीं मरूं लागले, प्रेतांचा पर्वत झाला, रक्ताचे सरोवर झालें, आणि त्यांत कमळाप्रमाणें वीरांची मस्तकें दिसू लागली. त्वेषानें जो तो आपआपले देहावसान विसरून गेला. प्रत्येकजण केवळ क्रूरतेच्या प्रत्यक्ष मूर्तीप्रमाणे दिसू लागला. त्या वीरांची शस्त्रे यंत्राप्रमाणे चालली होती, घायाळ होऊन पडलेले वीर पाणी पाणी म्हणून टाहो फोडीत होते, झडप मारून मासाचे गोळे उचलून आकाशांत नेत होते, पाहून प्रत्यक्ष रणदेवता रणांगणावर थै थै नाचत आहे असे वाटत होते. दक्षाचा तो विलक्षण पराक्रम पाहून वीरभद्र प्रजापतीवर अत्यंत खवळला व हातांत त्रिशूळ घेऊन, त्याच्या अंगावर घांवला. त्याला वाटेंत थांबवून घर- ब्याचा दक्षवीरांनी फार प्रयत्न केला, परंतु सिंह जसा हत्तीचीं गंडस्थळें तें गृध्रादि पक्षी भयंकर युद्ध