पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक त्यांच्या झाला, परंतु युद्धाला स्वत: जाण्याचाच त्यानें शेवटी निश्चय केला, तो आपच्या सुमति प्रधानाला ह्मणाला, " सुमति ! तुझें म्हणणे खरें आहे; परंतु सेवकांना पाठवून निभाव लागेल असे वाटत नाहीं. तो वीरभद्र महाप्रबळ असून आपणाबरोबर कित्येक अक्षौहिणी सैन्य घेऊन आला आहे. त्याचे निर्मुलन करण्यासाठी मला स्वत:लाच गेले पाहिजे. मार्गे प्रसूती, कन्या व त्यांचा परिवार आहे त्यांचें आपण संरक्षण करा, तसंच यज्ञ व यज्ञमंडप याचाहि सांभाळ करा, युद्धांत देह पतन होणें या सारखे दुसरे श्रेयस्कर असें कांहींच नाहीं, शरिराचें संरक्षण करण्याचा प्रयत्न करावयाचा ह्मणजे तें कांहीं पुरुषाचें खरें कर्तव्य नव्हे. शरिराचं संरक्षण व युद्धांत देहपतन हे अमृत व मोक्ष याप्रमाणे आहे. अमृत हैं सर्वानां प्रियकर खरें, परंतु मोक्षाची योग्यता अमृताहून अधिक आहे. त्या मो- क्षाच्या प्राप्तीला सोडून मूर्ख असेल तोच शरीरसंरक्षण करण्याचा प्रयत्न करील. याप्रमाणें सुमतीला सांगून दक्षानें युद्धाची तयारी केली व तो रणभेरी वाजत असतां मोठ्या त्वेषानें वीरभद्राचे सैन्यावर चालून गेला. दक्ष येत आहे असे पाहिल्याबरोबर सैन्यानें मोटा जयघोष करून दुंदुभी वाजविल्या. महानादानें आकाश भरून गेलें, त्रिभुवन डळमळू लागले, घोडे किंकाळू लागले, व हत्ती किंकाळ्या फोडूं लागले. आपआपली शस्त्रास्त्र सांवरून सैनिक सज झाले. याप्रमाणे तयारी झाल्यावर वीरभद्राने आपल्या सैन्याला सूचना केली. त्याबरोबर सैन्य मोठ्या वेगानें दक्षसैन्यावर धावू लागले. दोन्हीं सैन्यें भिडल्यावर वीरभद्र दक्षावर क्रुद्ध होऊन ह्मणाला; या युद्धाचे भानगडीत पडण्यापेक्षां तूं महादेवांना हविर्भाग देण्याचें कबूल कर, किंवा तसे करावयाचें नसल्यास यज्ञमंडप आमचे स्वाधीन कर, ह्मणजे त्यांत आह्मीं तुझाच हविर्भाग टाकून महादेवांनां संतोषित करूं." तेव्हां दक्ष ह्मणाला, " वीरभद्रा ! रणांत जाऊन युद्ध करणें हा तुमचा विषय नव्हे. तुम्हीं त्या शंकराबरोबर हिंडून भीक मागत देशाटण करावें, किंवा स्मशानांत त्याच्या सन्निध बसून तो जें देईल तें भक्षण करावें, गिरिकंदरांत नागवें उपडें हिंडावें, अशा प्रकारचा जो तुमचा अमा- नुप व्यवसाय, तो सोडून तुला हें मरणाचे डोहाळे कां आठवले, तें मला कळत नाहीं. अरे वीरभद्रा ! मजबरोबर युद्ध करून जय मिळविण्याची जर कांहीं आशा असती तर शंकरच स्वतः युद्धाला आला असता, पण मरणाच्या भीतीनें तो तिकडे गिरिकंदरांत बसून तुझां पोरासोरांना केवळ मृत्यूच्या स्वाधीना करण्यासाठी त्याने पाठविले आहे. वीरभद्रा ! तूं नुकताच काल जन्मलेला पौर, तुला ही युद्धविद्या कोठून माहित असणार तुला आपल्या अज्ञानावस्थेमुळे 'युद्धांतले काठिण्य अद्यापि माहित झालेले नाहीं; ती एक मौज आहे असें तुला चाटत असेल, पण विचार कर, माझ्या शस्त्रांनी विव्हल झाल्यावर तुला अत्यंत पश्चात्ताप होईल, त्यापेक्षां युद्ध न करितां परत जा, मी तुला जिवंत दक्षा !