पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

7 अध्याय ११ वा. ३२. ] वळविली. जीवजंतूवर दया करावी असा मनुष्याचा स्वभाव आहे, परंतु पोटांत जंत झाल्यास त्याचे कोणी संरक्षण न करितां औषधाच्या योगाने त्यांचा नाश करितात. त्या प्रमाणे भृगुऋषि शिवसैन्याला त्रास देत असल्यामुळे मणिमंत क्रुद्ध होऊन भृगूवर धांबून गेला व त्यानें भृगूला क्षणार्धात झुंडेनें धरून शिव- सैन्यांत झुगारून दिलें. शिवगणांनी त्याला पकडून दरभाच्या दोरखंडांनी गच्च बांधिलें. 2 २. वीरभद्राचा पराक्रम. दक्ष प्रजापतीला भृगूऋपीचा मोठा भरंवसा होता, आणि तशी भृगुऋ - पीच्या अंगीं शक्तिही होती. केवळ मंत्रानें ज्यानें हजारों शरभ व ऋषभ निर्माण केले, त्या भृगूला मणिमंतानें धरल्याचें ऐकून दक्षाचें धैर्य खचून गेलें, तथापि तो पुरा प्रयत्नवादी होता, कितीही संकटे आली तरी, आयुष्याच्या शेवटच्या निमिषार्धापर्यंतहि प्रयत्न करावयाचा, असा तो विलक्षण दृढ निश्चयाचा होता. त्या वेळी कसें करूं काय करूं, याचा विचार न करितां त्यानें शक्य तितकें सैन्य गोळा करून एकदम युद्धाची तयारी केली. त्या राजाचा सुमति नावाचा प्रधान होता, तो आपल्या नावाप्रमाणेच सुमति होता. तो राजाला ह्मणाला: महाराज ! विपत्तिकाळ हा केव्हां कोणावर येईल याचा कांहीं देखील नियम नाहीं, तथापि प्रसंगीं धैर्य न सोडतां कांहीं धनाचा व्यय करून दानधर्म करावा. कारण असें हाटलें आहे किं आपदर्थे धनं रक्षेदारान् रक्षेद्धनैरपि । आत्मानं सततं रक्षे दारैरपि धनैरपि ॥ १ ॥ तसेंच शक्य तितका प्रयत्न करून स्वतःच्या शरिराचेंहि संरक्षण करावें. जो पर्यंत आपणाजवळ आपले सेवकजन आहेत, जोपर्यंत आपला परिवार आहे, तोपर्यंत आपण स्वतः युद्धाला जाऊं नये, पुत्र व कन्या यांना देऊनहि स्वतः च्या शरिराचें संरक्षण करावें, असें शास्त्र आहे. मग आपणाजवळ तर अद्यापि पुष्कळ सैन्य असून आपला परिवारहि आहे, तेव्हां आपण स्वतः युद्धाला जाऊं नये. राजनीति अशी आहे किं, अगोदर संधि करण्याचा प्रयत्न करावा, त्य. नें कार्यभाग न झाल्यास भेदाचें अवलंबन करावें, आणि मग दान करून परा- क्रमही करावा. शरीर सुरक्षित राहिल्यास राज्य, संतति व संपत्तिहीं फिरून मिळ- वितां येते, परंतु शरीर गेल्यास तें फिरून मिळत नाहीं. ह्मणून जोपर्यंत आप णाजवळ आझांसारख्या सेवकजनांचा परिवार आहे, तोपर्यंत आपणास याबद्दल कांहींच चिंता करण्याचे कारण नाहीं. आपल्या धन्यावर संकट आले असतां जे सेवक आपले स्वतःचें रक्षण करण्याचा प्रयत्न करितात ते नरकाला जातात. " सुमति प्रधानाचें हें बोलणें ऐकून दक्षाला फार संतोष