पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ [ स्तबक 6: धराला आमची लाज राखण्याची कांहीच काळजी नाहीं हें कसें ? अहो ! हा तर सर्वच प्रकार उलटा होत आहे. का चमण्याचा प्रकाश रत्नापेक्षां अधिक पडावा, किंवा काजव्यानें सूर्याला लाजवावें, मातीनें सुवर्णाला फिकें ठरवावें, किंवा रंकानेंच राजाचा पराजय करावा, किंवा उंदरानें सिंहाला धरावें, त्या प्रमाणे त्या पिशाच्चांनी दिक्पाळांचा नाश केला, झोटिंगांनी महेंद्राला जिंकिलें, अहो भृगृऋषि ! हें अपमानाचें दुःख मरणापेक्षांहि अधिक तापद होय. या वेळीं काय करावें तें मला तर कांहींहि सुचत नाही. मी आपले शरीर, संपत्ति व सैन्य यज्ञासाठी खर्च करण्याचें योजिले आहे. त्याप्रमाणें पैसा तर मी खर्च केलाच आहे, सैन्याचाहि उपयोग केला आहे, आतां हैं शरीर खर्ची घालून हा याम पुरा केला पाहिजे. " दक्षप्रजापति असें ह्मणाल्यावर भृगुऋषि ह्मणाले; राजा ! तूं मुळींच काळजी करूं नको, मी मंत्रशक्तीनें आतां सर्व शिवसैन्याचा नाश करून टाकितों. ” असें ह्मणून भृगने आपल्या हातांत उदक घेतले व ते मंत्रून अग्नीवर टाकिलें. त्याबरोबर असंख्य विक्राळ वदनाचे ऋषभ हातांत अग्निशस्त्रे घेऊन निर्माण झाले व ते भृगूला काय आज्ञा आहे, हाणून विचारूं लागले. तेव्हां भृगूनें त्यांना शिवसैन्य दाखविले व त्यांचा नाश करण्यास सांगीतले. परंतु मातीच्या कच्या घड्यामध्ये पाणी ठेवण्याचा प्रयत्न केल्यास पाणी जसें घटाचा नाश करून बाहेर पडते, त्याप्रमाणे झोटिंग आदि भूतांनी ऋषभांचा नाश केला. तो प्रकार पाहून भृगूनें नरसिंहाची प्रार्थना केली, व बीजमंत्रानें आवाहान करून बाण सोडिला. त्याबरोबर अनेक नरसिंह निर्माण झाले व ते भूतांनां नाहींसे करूं लागले. त्यांच्या पुढे आपले कांहीं चालणार नाहीं असे जाणून भूतें रणांगणांवरून पळाली व ती पिंपळाचे झाडावर जाऊन बसली. भूतें पळाल्यापन: ऋषभ रणांगणावर आले व ते आपल्या तस अस्त्रांनी पारभद्राच्या लागले. तेव्हां सर्वांच्या पुढे असलेलें चंडी- शाचें सैन्य फार त्रस्त झालें, व तें त्या अग्नीच्या भीतीनें पळून गेलें व त्यांनीं नदीचा आश्रय केला. ऋषभांनी याप्रमाणें चंडीशाच्या सैन्याला पळविल्यावर दक्षाचे सैन्याला पुनः धैर्य आलें व ते रथ, घोडे, हत्ती, सज करून त्वेषानें वीरभद्राचे सैन्यावर येऊ लागले. त्या वेळी नंदीनें शिवाच्या चकोरांचें स्मरण केले. त्याबरोबर तेथें शिवचकोर प्राप्त होऊन त्यांनी त्या ऋपभांची सर्व अग्न्यस्त्र खाऊन टाकिली. जोपर्यंत दक्षाकडे भृगुऋषी आहे, तोपर्यंत आपणास जय प्राप्त होणार नाहीं, असे ओळखून मणिमंत भृगूवर अत्यंत क्रुद्ध झाला व तो भृगूच्या नाशाचा प्रयत्न करूं लागला. ब्राह्मण हा सर्वांना वंद्य असून त्याची हत्या कोणीही करूं नये, परंतु तो जर अविचारी व दुर्जन असेल, तर तो निंद्य ठरवून त्याचा खुशाल नाश करावा, असें शास्त्र आहे. त्या प्रमाणें तो भृगुऋषी ब्राह्मण -खरा, परंतु दुष्टांचा सहायक असल्यामुळे मणिमंतानें आपली झुंडा त्याच्याकडे " कथाकल्पतरु.