पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा.] अध्याय ११ वा. भृगुऋषी, व अन्य अनेक मंत्रविद्या जाणणारे ब्राह्मणही दक्षिणेसाठी दक्षाचा अभिमान धरून यज्ञमंडपांतून बाहेर पडले; व मंत्रशक्तीनें वीरभद्राच्या सैन्याचा नाश करण्याच्या उद्देशानें ते वीरभद्राकडे हातांत दर्भाच्या काड्या घेऊन धाऊं लागले. तो मंत्रशक्तिसंपन्न ब्राह्मणसमुदाय व युद्धविद्याविशारद असा सैन्य- भार पाहून, शिवगणांनी शंख वाजवून आपल्या सैन्यास सूचित केलें. दोन्ही सैन्यें एकमेकांस भिडलीं, व अत्यंत भयंकर अशा युद्धाला आरंभ होऊन एकमेकांच्या शरभारांनीं सूर्य दिसेनासा झाला. क्षिप्रानदीला रक्ताची नदी जाऊन मिली, त्यांत शिरकमळें व अन्य अवयव वहात चालले. खड्गांच्या खणखणा- टांनी ठिणग्यांचा वर्षाव होऊन पटापट वीरांचे अवयव शतखंड होऊं लागले. कित्येक वीरांची कबंधें शिरावांचूनच धांवत सुटलीं. नंदी व मणिमंत यांनी दक्षाच्या कै- न्यावर निकराचे हल्ले करून सर्व सैन्याची दाणादाण करून टाकिली. तेव्हां इंद्राने व वरुणानें आपआपले हत्ती व घोडे त्या दोघांच्या अंगावर घालून नंदीला व मणिमंताला मागें रेटीत रेटीत नेलें. घोड्यांच्या टापांनी व हत्तींच्या शुंडांनी वीर भद्राचें सैन्य हैराण होऊन तें मागें परतूं लागले; परंतु वीरभद्रानें त्यास थांबवून धरून झोटिंग जखिणी दक्षसैन्यावर सोडून दिल्या. त्या झोटिंग जत्रिणींनी दक्ष- सैन्याची दाणादाण करून अनेक वीरांची मस्तकें धडापासून निराळी केली. त्या सैनिकांचे रिकामे झालेले घोडे व हत्ती सैरावैरा धांवूं लागले, रणांगणावर एकच गर्दी होऊन गेली, वीरांच्या जयसूचक ध्वनींनी दिशा कोंदून गेल्या, आणि जणूं काय रणदेवता प्रसन्न होऊन वीरभद्राला आशीरवादच देत आहे असे वाटलें. अशा त्या उत्साहजनक प्रसंगामुळे शिवमैन्यांतील वीरांनां विरक्षण स्फुरण चढले व त्यांनी ज्याप्रमाणे कोयत्याने केळी काया त्याप्रमाणे शस्त्रांना दक्षवीर कापून काढले. झोटिंग व जखिणी दि प्रकारच्या चेष्टा करूं लगल्या. कोणाचे मुकूर नी वां द्याव वस्त्रे घेऊन तीं फाडून टाकावी, दोघांदोघांना एकाच ठिकाणी बांधावें, कोणाचे पाय बांधून त्याला फरफरा ओढावें किंवा उफराटें टांगावें, अशा चेष्टश करून त्यांनीं दक्षाच्या मृतवीरांची शस्त्रे घेतली व त्यांच्याच वाहनावर बसून दक्षवीरांनां सळो की पळो करून सोडिलें. त्या भयंकर प्रकारानें दक्षसैन्य भय- भीत होऊन मोठ्या विवंचनेंत पडलें, इतक्यांत महेंद्र रथाखाली पडला. प्रत्यक्ष देवेंद्राची जेव्हां अशी स्थिति झाली तेव्हां हा वीरभद्र नसून काळच आमचे प्राण हरण करण्यासाठी आला आहे असे वाटून दक्षसैन्य वाट सांपडेल तिकडे पळत सुटलें. त्या गर्दीत असंख्य घोडे, हत्ती, रथ वगैरे शिवदूतांनी लुटून आणिले ती खेदकारक पराजयाची वार्ता दक्षप्रजापतीचे कानावर गेल्याबरोबर तो हताइ झाला, आपला काळ फिरला असें त्याला वाटू लागले. तो भृगु श्रीला ह्मणाला “ अद्दा भृगुऋषी ! आझी शाईगधरासाठी हा यज्ञ करित असून त्या साईंग-