पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक मल्लयुद्ध करण्यास आरंभ केला. पेंचावर पेंच लढवून एकमेक मोकळे होऊं लागले, तेव्हां चंडीशानें नागपेंच घालून पूषाला चीत केलें, व त्याला जिवंत धरून तो आपल्या सैन्यांत घेऊन चालला. याप्रमाणे दक्षाच्या सैन्याचा मुख्य सेनापति शिव सैन्यानें पकडल्यावर शिवगणांनीं चंडीशाचा जयजयकार क आकाशमंडप दणाणून टाकिला. सर्वोना मोठा आनंद झाला, चंडीशाला आलिंगन देऊन त्याचा मोठा गौरव केला. तिकडे पृ ल्याबरोबर दक्षाचें सैन्य भयानें व्याकूळ झालें व जो तो आपापला रणक्षेत्रांतून पळून गेला. अशा रीतीनें दक्षसैन्य निघून गेल्यावर द्यांचा गजर करित मोठ्या जयजयकारानें मागे परतलें; आणि रण लेल्या मेदमांसावर गृआदि पक्षांची मेजवानी सुरू झाली. w yer न घालव अध्याय ११ वा. १ वीरभद्र व दक्ष यांचें युद्ध.. वीरभद्रानें रात्रभर आपल्या सैग्याला विश्रांति दिली, दुसरे दिवशीं सूर्योदय झाल्यावर त्याने आपले सैन्य सज करून, बृहस्पति नगराकडे दक्षप्रजापतीचा नाश करण्यासाठीं कुच केलें. इकडे यज्ञमंडपांत रणभूमीवरून पळून आलेल्या सैनिकांनी घडलेली एकंदर दुःखकहाणी कथन केल्यावर सर्वांची तोंडे काहीन होऊन गेली, आणि या संकटांचें निवारण आतां कसें करावयाचें याचा सर्वजण विचार करूं लागले. दक्षाला तर काय करावें तें समजेना. भग्न व पूपा या पुराक्रमी सेनापतींना वीरभदानें जिवंत पकडल्याचें वर्तमान ऐकून त्याला अत्यंत तो फार क्रुद्ध झाला. हलकन्याकडून त्यानें तत्क्षणी पर पैन्याला भाजूळ, इंद्र, यम, चंद्र, वरुण, वगैरे देवांना बोलावून युद्ध करण्याचा विचार चालविला. तो ह्मणाला, " देवेंद्रादि लोकपा हो, मी द्दा यज्ञ केवळ तुझांस हविर्भाग मिळावा ह्मणून व ब्राह्मणांना संतोषित करावे झणून करित आहे. अशा प्रकारचे सत्कृत्य कितीहि दिमें आली तरी पूर्ण करा हा वीरांचा धर्म होय; त्याप्रमाणे मी हा यज्ञ, शंकरानें कितीही मोडण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटास नेणारच. तुह्मां सर्वोचें साह्य असल्यास आपण आतां त्या वीरभद्राचा नाश करून व भग्न व पूपा यांना सोडवून आणून यज्ञ पूर्ण करूं." दक्ष प्रजापती यज्ञमंडपांत बसून याप्रमाणें भाषण करित आहे, तोंच वीरभ- द्राचें सैन्य क्षिप्रा नदीचे कांठी येऊन थडकलें, व त्याच्या रणवाद्यांचा ध्वनि यज्ञमंडपांत स्पष्ट ऐकूं येऊं लागला; तेव्हां दिक्पाळांनी दक्षप्रजापतीला यज्ञमंडपांत बसावयाला सांगून, आपणाबरोबर रथ, हत्ती, घोडे, वगैरे असंख्य चतुरंग सेना घेतली; व ते वीरभद्राला अडवून धरण्यासाठीं बृहस्पतिनगराचे बाहेर पडले.