पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. रा.] अध्याय १० वा. मूर्ख लोक रत्नकांचनासाठी रात्रंदिवस धडपड करीत असतात. द्रव्य हें कलिस्वरूप असल्यामुळे शिव त्याकडे कधीं ढुंकूनहि पहात नाहींत. त्या कलिस्वरूप लक्ष्मीचा विष्णूनीं स्वीकार केला आहे. विष्णूची स्त्री लक्ष्मी ही चंचल, केव्हां कोणाकडे जाईल याचा नियम नाहीं, म्हणून शंकरानी परम पवित्र अशा पार्वतीचा स्वीकार केला. मोक्षाच्या प्राप्तीसाठी लक्ष्मी उपयोगी पडत नसून शंखादि मण्यांनच मन निर्विकार रहातें, म्हणून रुद्राक्ष व शंखमणी यांची किंमत ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने फार मोठी आहे. अशा पवित्र अलंकाराला टाकून त्या रत्नकांचनरूपी नरकाच्या सामग्रीची आशा पार्वती कधीही करणार नाही. ६१ आतां पार्वतीला पुत्र नाहीत म्हणून तिनें देह दहन केला, हें तुझें म्हणणें साफ खोटें आहे. अरे ! जी या साऱ्या विश्वाची जननी, सर्व प्राणिमात्र जिनें निर्माण केले आहेत, मनांत आल्याबरोबर मानसपुत्र निर्माण करण्याची शक्ति जिच्या अंगी आहे, त्या आदिमातेला पुत्र नाहींत म्हणून तिनें देह दहन केला, असें मूर्ख व कपटी यावांचून कोणीही म्हणणार नाहीं. ती आपल्या पतीवर राग करील, असे कधींहि होणार नाहीं. ती महासाध्वी शंकरावर इतकें प्रेम करीत असे किं, तिनें त्यांच्या अर्ध्या शरिरांत वास केला होता. पार्वती ही माया असून शंकर हे ब्रह्म आहेत, तेव्हां माया ही ब्रह्मावर रागावेल असें कधीं तरी होईल काय ? पार्वती ही श्रुाते असून शंकर हे ओंकार आहेत. एखादे वेळीं सूर्य पश्चिमेला उदय पावेल, प्रकाश व छाया ह्रीं एखादे वेळ दूर होतील, पण पार्वती शंकरावर कधीं रागावणार नाहीं. हे दक्ष प्रजापते ! तूं फारच अज्ञानी आहेस, निंद्य कृत्य करून आणखी तें जिरविण्याचा प्रयत्न करीत आहेस. तूं जर शंकरांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न न केलास, तर तुझ्या विटंबनेस पारावार उरणार नाही. शंकरांनीं वीरभद्रा- बरोबर प्रचंड सैन्य देऊन त्यास तुझ्या पारिपत्यासाठी पाठविले आहे. तेव्हां त्या शंकरांनां मुकाट्यानें शरण जाऊन त्यांनां हविर्भाग दे, आणि त्यांची क्षमा माग. आणखी तसे करण्याची इच्छा नसल्यास युद्धाला तयार हो." ३ दक्षप्रजापति व वीरभद्राचें युद्ध. अनेक कारणांमुळे उन्मत्तपणा प्राप्त झालेल्या पुरुषाला उपदेश रुचत नाहीं. व त्याला अशा उपदेशानें कांहीं बोध न होतां तो उलट अधिक क्रुद्ध होऊन अविचारी कृत्याला मात्र प्रवृत्त होतो; तशी दक्षाची स्थिति झाली होती. चंडीशाच्या उपदेशाचा दक्षावर असाच परिणाम झाला. त्यानें आपला अपराध कबूल न करितां उलट तो चंडीशावर रागावला, व त्याला ह्मणाला; " चंडीशा सिंह स्वस्थ बसलेला आहे असे पाहून जंबुकांनी त्याच्यापुढें वेडेचार करणें हें अप्रशस्त होय. वीरभद्रासारखी घुंगुरडीं केवळ आपला प्राण देण्यासाठी व्यर्थ युद्धाला येत आहेत. मी आपला शब्द कधींही मागे घेणार नाहीं. मजकडून "