पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ कथाकल्पतरु. [ स्वबक याचा शंकराला कधींहि हविर्भाग मिळणार नाहीं. प्रत्यक्ष शंकरानें येऊन माझी कितीहि विनवणी केली, तरी हविर्भाग मिळणार नाहीं. तुमची युद्ध करण्याची इच्छा असल्यास माझीहि तयारी आहे, पण तुम्हीं व्यर्थ मराल, विचार करा." दक्षानें अशी गर्जना केल्यावर चंडीश तेथून निघाला, व भद्रा- चतीस येऊन त्यानें झालेली हकीकत वीरभद्राला सांगितली. तो त्या दक्षाचा उन्मत्तपणा ऐकून वीरभद्राला साहजिक फार क्रोध आला, व त्यानें नौवत वाजवून सैन्यास कूच करण्याचा हुकूम दिला. शिवगणांनी आपापली शिंगे फुंकल्याबरोबर सर्व सैनिक आपआपली शस्त्रे व वाहनें घेऊन सज्ज झाले, व त्यांनी कूच करण्यास आरंभ केला. तिकडे दक्षानेंहि आपले सर्व सैन्य तयार केलें व ' पृपा' याला सेनापति नेमून युद्धाकरितां त्याची रवानगी करून दिली, परंतु दक्षाचे सैन्याला शुभ शकून न होतां, अशुभ शकून होऊं लागले. कोल्हे दिवसा ओरडूं लागले, कावळे करकर करूं लागले, व छाया शिरावांचून दिसूं लागली. या अपशकुनांमुळे दक्षाच्या सैन्याचें धैर्य खचून गेलें, तथापि तसेच पुढें कुच करून त्यांनी वीरभद्राचे सैन्याला गांठले. दक्ष- प्रजापतीचें सैन्य पाहिल्याबरोबर वीरभद्राचे सैन्याला विलक्षण स्फुरण चढलें. व तें प्रजापतीचे सैन्यावर मोठ्या वेगानें विजेप्रमाणे जाऊन पडलें. त्या वेळी, उभय सैन्याच्या धुमाकुळीनें ब्रह्मांडाचा प्रळय होतो किं काय, असा भास झाला.. धुळीनें दिशा धुंद होऊन सूर्य दिसेनासा झाला. काळोख पडल्यामुळे एक- मेकांचे वीरहि ओळखूं येईनात. शंखाच्या नादानें आकाश दुमदुमून गेले.. परस्परांच्या शस्त्रांचे शस्त्रांवर आघात झाल्यामुळे ठिणग्या निघून त्या अंधारांत चमकूं शिववीरांनी पहिल्याच चकमकीत दक्षाचे हजारों वीर मारून, रण- क्षेत्रावर मांसाचा चिखल करून टाकला. त्यांतून रक्त नदीप्रमाणे वाहू लागले, व हाडांचें चूर्ण त्या नदीतील वाळूच आहे किं काय असे वाटू लागले. शिव- सैन्याचा तो पराक्रम पाहून दक्षाचे मांडलिक राजे, गंधर्व, दिक्पाळ मोठ्या त्वेषानें शिवसैन्यावर धांवृन आले, तो प्रकार पाहून नंदी त्या सर्वांवर वेगानें धांवून गेला, तेव्हां त्याला भग्नवीर अडवा होऊन म्हणाला; " अरे नंदी- बैला ! तुझें काम भार वाहण्याचे आहे, तें तूं सोडून या युद्धाच्या गर्दीत कशाला आलास ? बाहेर रानांत जाऊन गवत खाऊन स्वस्थ बसावयाचें टाकून ही लढाईची बुद्धि तुला कोठून सुचली. " मग नंदी म्हणाला; " अरे भग्नवीरा ! तूं खरा वीर असल्यास बोलण्यांत वेळ न घालवितां युद्धा-* लाच आरंभ करशील. " असें म्हणून नंदीनें मस्तकाची धडक मारून भग्न- बीराचे कित्येक हत्ती च घोडेस्वार लांच फेंकून दिले. तें नंदीचें कृत्य पाहून भग्नवीरानें आपला रथ नंदीचे आंगावर घातला व आपली गदा गरगर फिर वृन ती नंदीचे मस्तकावर मारिली, परंतु नंदीनें तो घाव सहन करून मस्तकाची लागल्या.