पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय १० वा. भूमीवर शामवर्णाचा एक विशाल देहधारी, अत्यंत शक्तिसंपन्न असा ' वीर- भद्र जटादांत' नावाचा शंकराचा बाहुनंदन निर्माण झाला. त्या वीरभद्राचे दांत भयंकर होते, तो सर्व शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण असा होता. त्याच्या हातांत डमरु त्रिशूळ, गदा, सुरी, मुसळ, भेरी, काळपाश, धनुष्य, बाण, तलवार, शंख, चक्र, परशु अशी अनेक सोज्वळ शस्त्रं होतीं. मस्तकावर पिंगट जटा असून त्यावर मुकुट होता. कपाळास भस्म लाविले असून त्यावर शेंदुराचा टिळा होता. आंगावर हत्तीचें कातडें होतें. गळ्यांत हाडांच्या माळा होत्या. व ठिकठिकाणी रुद्राक्षांची भूषणें होतीं. तो महादेवाला साष्टांग नमस्कार करून ह्मणाला, " हे नीलकंठा हे शूलपाणे! या सेवकाला काय आज्ञा आहे ती निवेदन करावी "शं कर त्या वीरभद्राला पाहून हर्षभरित झाले व ह्मणाले " अरे ! तूं माझ्या जटे- पासून झालेला माझा पुत्र आहेस, मी तुझें नांव वीरभद्र असे ठेवितों. तुला मी आपल्या सर्व शस्त्रास्त्रविद्या शिकवून सर्व त्रिभुवनांत अजिंक्य असा करितों. त्या दक्ष प्रजापतीचा नाश करण्यासाठी मी तुला निर्माण केले आहे, तर तूं बृहस्पति नगराचे ठिकाणी जाऊन सर्व देवांचे हविर्भाग हरण कर, वय- ज्ञाचा आणि यज्ञमंडपाचा नाश करून त्या उन्मत्त दक्षराजाचें मस्तक धडापासून कापून टाक. " या प्रमाणे महादेवांनी वीरभद्राला सांगितल्यावर त्याला सर्व शस्त्रास्त्रविद्या व जारणमारण वगैरे अनंत कला शिकविल्या. नंतर महाशक्ति कुठार वगैरे शस्त्रे दिलीं, व त्याला रणांत विजय मिळविशील असा आशिर्वाद देऊन, जाण्यासाठी निरोप दिला. २ चंडीश - शिष्टाई. वीरभद्रास निरोप मिळाल्यावर त्यानें शंकरांस वंदन करून प्रदक्षिणा केली, व तो आपणाबरोबर शिवसैन्य घेऊन निघाला. त्याच्या बरोबर नंदी, मणिमंत, भद्र, भैरव, डांगी, भृंगी, चंडीश वगैरे अनेक युद्धविद्या विशारद असे वीर होते. चौसष्ट योगिनी, नऊकोटी कात्यायनी, छपन्न कोटी चामुंडा, नऊ नरसिंह, चौदाशें मायावी राक्षस, पंधराशे झोटिंग, आठ कोटी भुतें, आठ कोटी भैरव, शिवाय यक्ष, ब्रह्मराक्षस, शंखिनी, वेताळ, डंखिणी, पिसाटे, लावा, क्षेत्रपाळ वगैरे वीरही कित्येक होते. शिवाय हत्ती, घोडे, रथ, हींहि असंख्य होतीं. न- गारे, नौबती, भेरी, तुतान्या, कर्णे, शिंगे, वगैरे प्रचंड वाद्ये वाजविणारे वाजंत्री; निशाणे घेऊन पळणारे घोडेस्वार यांचे ताफेच्या ताफे होते. हा सर्व सैन्यभार घेऊन वीरभद्र निघाल्यावर भव्य देखावा दिसू लागला. रण वाद्याच्या ध्वनींनीं आकाश दुमदुमून गेलें, धुळीमुळे दिशा धुंद झाल्या; मेदिनी पुढील भयानें "डळमळू लागली; आकाशांत गृध्रादि पक्षी लवकरच मोठी मेजवानी मिळणार ाणून भराज्य मारूं लागले; मृतवीरांची गर्दी होणार म्हणून स्वर्गाचीं द्वारें अगो- दरच उघडून ठेविलीं, व अप्सरा पुष्यांच्या माळा गुंफूं लागल्या. हळू हळू .