पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ कथाकल्पत रु. [ स्व.अक १ विशेष कुद्ध झाली नाहीं; परंतु यज्ञ - कुंडाजवळ तुमचा हविर्भाग नाहीं, हें पाहून तर देवी अत्यंत क्रुद्ध झाली " मी दक्ष प्रजापतीची मुलगी असें म्हणून घ्यावयाला मला लाज वाटते" असें बोलून पार्वतीनें यज्ञ कुंडाजवळ पद्मासने घातलें व योगचलानें स्वतःचा देह जाळून घेतला, तेव्हां नंदी व शिव- गण यांनां संताप आला, व त्यांनी मंडपांत शिरून सर्व यज्ञ मंडपाचा विध्वंस करून टाकिला, अनेक ऋषींनां व राजांनां पळवून लाविलें, यज्ञ सामुग्री उधळून मातीत मिळवून दिली, परंतु इतक्यांत भृगु ऋषीनीं यज्ञ-कुंडांतून • मंत्रशक्तीनें शरभ निर्माण केले व त्यांच्याकडून शिवगण व नंदी यांनां पळवून लाविलें. आतां त्यांनी फिरून मंडप वगैरे घातला असून यज्ञाला आरंभ केला आहे. " नारदमुनि याप्रमाणे महादेवाला हकीकत सांगत आहेत, तींच शस्त्रांच्या मारानें विव्हळ झालेले नंदी व शिवगण तेथें आले. त्यांची ती स्थिति पाहून महादेवांनां अनिवार राग आला. प्रथम त्यांनीं नंदी व शिवगण यांची शरीरें पूर्ववत् केली व झालेल्या एकंदर प्रकाराविषयी विचार करीत बसले. त्या विचा- रानें प्रत्येकक्षणी त्यांचा कोप वाढत चालला होता. शेवटी त्यांची अशी स्थिति झाली की, त्यांनी आपल्या शरीरांत त्रिभुवनांतला कोप सांठविला आहे असे दिसूं लागले. तमोगुणाचा समुद्र उचंबळावा त्याप्रमाणे त्यांची मूर्ति दिसूं लागली. प्रळय काळाच्या वेळी जें महादेवांचे स्वरूप असतें, तेंच या वेळींहि दिसूं लागलें. रागानें त्यांची हनुवटी कांपावयाला लागली, डोळे अग्नीप्रमाणें लाल होऊन ते गरगर फिरवूं लागले, त्यांनां संतापाच्या भरामुळे आसनावर स्वस्थ बसतां येईना, बाहू स्फुरण पावू लागले, दांत करकरां बाजूं लागले, अंगाला दरदरून घाम सुटला, त्यांनी भस्म उधळून दिले, त्यांचा हात थरथर कांपत असल्यामुळे कमंडलू हालूं लागला, डमरु आणि डौर ( समेळ ) फोडून टाकिला, कौपीन फाडून टाकिले, जटा मोकळ्या सोडल्या, पाशुपत व त्रिशूळ ह्रीं टाकून दिलीं, धनुष्य फेंकून दिलें, कमरेचा करगोटा तोडून टाकिला आणि • छाटी दूर झुगारून दिली. तें शंकरांचें भयंकर ऋद्ध स्वरूप पाहून नारद तर भीतीनें दूर पळून गेला. त्या क्रुद्धावस्थेत शंकरांनी आपल्या मस्तकावरील जटें- तून एक जटा उपटून ती रागानें भूमीवर आपटली. त्या आपटण्याबरोबर · सहस्र प्रचंड मेघांचा एकच वेळीं गडगडाट व्हावा त्याप्रमाणे मोठा आवाज झाला. संपूर्ण त्रिभुवन हालावयाला लागलें, मेदिनीला कंप सुटला, लोकपाळ भिऊन गेले, नादानें आकाश दुमदुमून गेलें, समुद्र विलक्षण उचंबळू लागला, या सर्व गोष्टींमुळे प्रळयकाळ जवळ आला, असे वाटावयाला लागलें. आकाश कोसळून पडतें किं काय ह्मणून लोक साशंक झाले. ह्या विलक्षण प्रकारानें पाताळांव शेष घाबरून जाऊन तो आपल्या सहस्र फणा हालवूं लागला. ती. जटा भूमीवर पडल्याबरोबर विजेप्रमाणे आकाश मार्गाने निघून गेली. व त्या