पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] ५७ 'आपले डोळे झांकून घेतले. कित्येक आपसांत हळूहळू म्हणूं लागेल; अहो ! आह्मीं दोन पैशांच्या आशेने येथे आलों, पण प्राक्तन बरोबर नसल्यामुळे येथें हे असें संकट ओढवलें. शिवगणांच्या त्या धुमाकळीने तेथून सर्वजण निघून गेले, परंतु भृगु वगैरे मोठमोठाले ऋषि आपापल्या आसनावरून मुळींच उटले नाहींत. तसेंच अष्टदिशांच्या दिक्पाळांनीही लवकरच युद्धाची तयारी केली, व ते शिवगणांनां तेथून घालवून देऊं लागले. परंतु शिवगण व नंदी त्यांनां मुळींच आटोपेनात, तेव्हां भृगुऋपींनीं यज्ञकुंडांत बीजमंत्रानें उदक टाकून एक सहस्र शरभ निर्माण केले. त्यांच्या हातांत अग्नीचेच भाले होते. त्या भाल्यांनी त्यांनी सर्व शिवगणांना व नंदीला डाग देण्यास सुरवात केली. तेव्हां त्या आगीपुढे निरुपाय होऊन नंदी व शिवगण कैलासाकडे पळत सुटले. अशा रीतीनें आलेल्या संकटाचें निवारण केल्यावर दक्ष प्रजापतीनें पुन्हा यज्ञाची सर्व सामग्री मिळविली, मंडप वगैरे घातला, व फिरून यज्ञाला आरंभ केला. अध्याय १० वा. अध्याय १० वा. १ वीरभद्राची उत्पत्ति वैशंपायन ऋषि ह्मणाले; "राजा जनमेजया ! तो एकंदर प्रकार पाहून कलह- प्रिय नारदमुनि आनंदानें नाचूं लागले. महादेवांना हा प्रकार कळविल्यास या युद्धाला चांगलाच रंग येईल व पुढे आपणास मोठी मौज पहावयास सांप- डेल, असा विचार करून तो नारद क्षिप्रातिराहून निघून कैलासास गेला, परंतु तेथे महादेव नसल्यामुळे तो चित्ररथ अरण्यांत गेला. तेथें महादेव ध्यानस्थ बसले होते. महादेवांचें ध्यान केव्हां संपेल व आपण त्यांनां तो प्रकार केव्हा सांगूं, असें नारदाला झालें होतें. पण महादेवाचें ध्यान लवकर संपेना, तेव्हां त्यानें मोठ्यानें शंखध्वनि केला. तो ध्वनि ऐकून शंकरांनी आपले ध्यान विसर्जन केलें. ते डोळे उघडून पाहतात तो जवळ नारद उभा असून त्याचा चेहरा खिन्न झालला आहे व डोळे अश्रूंनी भरून आलेले आहेत. अशी ती नारदाची मूर्ति पाहून महादेव ह्मणाले, " नारदा ! असा दुःखी कां दिस- तोस तुला कोणी पीडा केली असल्यास मला सांग, हाणजे मी तिचें आतां निवारण करितों." नारद ह्मणाला; "देवाधिदेवा ! कैलासपते ! मी आपणाला एक अशुभ वार्ता सांगावयाला आलो आहें. एक मोठा अनर्थ घडून आला. देवी पार्वती, दक्ष प्रजापतीकडे यज्ञ समारंभ पाहण्यासाठी व आईबाप-चहिणी वगैरेंना भेटण्या- साठी ह्मणून गेली होती, परंतु त्या तिच्या क्षुद्र बहिणींनी व त्या उन्मत्त दक्ष प्रजापतीने तिचा फार अपमान केला व अत्यंत मानभंग केला. तरी पार्वती. 66 66