पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय वा. ती आदिमाया आदिशक्ति, अत्यंत संतप्त होऊन तप्त कांचनाप्रमाणें लाल दिसाव याला लागली. डोळे इंगळा प्रमाणे दिसूं लागले, संतापातिरेकानें तिचे ओठ थरथर कांपावयाला लागले. ती पार्वतीची ऋद्ध मूर्ति पाहून सर्व ऋषिमंडळी तटस्थ झाली, कित्येक पुढील भीत्युत्पादक विचारांनी साशंक झाले, कित्येकांचीं हृदयें धडधड करूं लागली. पार्वती ऋद्ध पण गंभीर स्वरानें ह्मणाली; " हे दक्ष प्रजापते ! तुझा विनाशकाळ जवळ आला आहे ह्मणून तुला ही अशी विपरीत बुद्धि होत आहे. अरे मतिमंदा ! जसा मूर्ख पाण्यावांचून वृक्ष लावण्याचा प्रयत्न करितो, त्याप्रमाणें तूं शंकराला हविर्भाग दिल्यावांचून हा यज्ञ करीत आहेस, बेडूक सर्पाच्या तोंडांत बळेंच जाऊन पडावा किंवा सिंहावर लांडग्यानें उडी मारावी, त्याप्रमाणें तूं शंकरास हविर्भाग न ठेविल्यामुळे आपल्या मृत्यूच तयारी करून ठेविली आहेस. तुला या अपराधाबद्दल आपल्या स्वतःच्या ( मस्तकाचा हविर्भाग महादेवांनां द्यावा लागेल. महादेवांनां सर्व देवही आपलें दैवत मानितात, तेव्हां त्यांनां हविर्भाग दिल्यावांचून हे देव तरी तुझीं अवदानें ग्रहण करितील काय ? तो ईश्वर सर्वांभूती सर्वत्र असून ब्रह्मदेव व विष्णु यानांदेखील ज्याचा पार लागत नाहीं, सूक्ष्म कीटकापासून तो हत्तीसारख्या प्रचंड प्राण्यापर्यंत सर्वोची उत्पत्ति, स्थिति व लय ज्याच्या हातांत आहे; त्या महादे- वांशीं वैर जोडून घेऊन तूं आपणावर संकट मात्र ओढवून घेतले आहेत. सर्व प्राणिमात्रांचे मुखाचे ठिकाणी महादेव, हृदयाचे ठिकाणी विष्णु व कटिस्थानी ब्रह्मदेव असतो; तेव्हां महादेवांचा अपमान करून तूं आपल्या मस्तकाचाच नाश करून घेतला आहेस. तूं माझा पिता नसून माझा वैरी आहेस. शंकराच्या स्त्रियेचा बाप इतका नीच असावा, याबद्दल मला फार लाज वाटते. अशा उन्मत्ताला यमपुरीं पाठविणें हेंच प्रशस्त होय, परंतु तूं श्वशुर म्हणून शंकरांनी जसे तुझ्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलें, त्याप्रमाणें मीही माझा पिता, म्हणून तुझ्या उन्मत्तपणाकडे दुर्लक्ष करितें. पण इतकी विलक्षण मानखंडना पार्वतीने कशी सहन करून घेतली, असे कोणी म्हणूं नये, म्हणून मीच आपला देह जाळून टाकतें. मी इकडे येतेवेळी शंकरांनी मला असे सांगितलें होतें किं- तुझा बाप दक्ष अत्यंत नीच, उन्मत्त व मूर्ख आहे, त्याच्याकडे तूं जाऊं नकोस; पण मी आपल्या पतीचें न ऐकतां केवळ कर्तव्य म्हणून या यज्ञप्रसंगी आले. आपल्या निष्कांचन मुलीवर दा पाषाणहृदयी बाप इतकी वक्रदृष्टि करील अशी माझी कल्पनाही नव्हती; परंतु याच्या मूर्खपणाचा अनुभव आज मला पूर्ण आला. पित्याकडून अशी अप- मानित झालेली ही पार्वती आपले तोंड महादेवांनां दाखविण्यास मुळींच योग्य नाहीं. मी पतीची आज्ञा उल्लंघिली, म्हणून मला देहदहनाची शिक्षा ही पाहिजेचं."