पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. ५४. आसनावर हिला बसवून यज्ञसमारंभ दाखवा. " प्रसूतीनें असें म्हटल्यावर त्या वस्त्रालंकारांनी नटलेल्या मुली क्षुद्र दृष्टीनें पार्वतीकडे पाहूं लागल्या, व तो तिचा तापसी जनाला शोभणारा वेष पाहून त्या एकमेकींकडे पाहून हंसू लागल्या; त्यांत जी थोडीशी चणचणीत मुलगी होती, ती तिर- स्कारानें पार्वतीकडे पाहून ह्मणाली; " आई! तूं हें काय आह्मांला भलतेंच सांगतेस? या भिक्षुकिणीला जर आह्नीं भेटलों तर हीं आमची बहुमूल्य वस्त्रे वाईट होऊन आमचे अलंकारही मळतील. आह्मीं सुस्वरूप लावण्य - लतिका असून या कांटेरी वेलीला तूं आलिंगन देण्यास सांगतेस, यावरून आई ! तूं फारच भोळी आहेस असें आह्मांस वाटतें." दुसरी एकजण विशेष शहाणी होती ती ह्मणाली; " आई ! ही जर आमची खरोखर बहीण असेल, तर हिला आह्मीं भेटूंदेखल; पण या अशा दरिद्री स्त्रियेला भेट दिल्याचें जर आमच्या पतींना कळेल, तर ते आह्मांस स्पर्शही करणार नाहींत. अशा या भस्मचर्चित स्त्रियेला आलिंगन दिल्यानें आमची ही मृदु व गौर तनु मळून जाईल, तो मळ धुवून तरी निघेल किं नाहीं कोण जाणे ?” तिसरी एकजण सर्वोहून हुशार होती, ती ह्मणाली; " अगे ! ही आपली बहीण तरी कसली; अशा निष्कांचन स्त्रियेला मी तर आपली बहीण असे कधींही ह्मणणार नाहीं. ही कोणीतरी भिकारीण असून या यज्ञसमारंभाचे वेळीं कांहीं पैसाअडका मिळेल, या उद्देशानें आली आहे;” असें ह्मणून तिनें पार्वतीचा दंड धरला व तिला जोरानें ढकलून ती ह्मणाली; १ जा भिकारडे ! बाहेर जाऊन भिका-यांच्या समूहांत बैस; त्यांच्याबरोबर तुलाही कांहीं मिळेल बरें. " बिचारी पार्वती बहिणींचीं कटु उत्तरें ऐकून अत्यंत दुःखी झाली. त्या वाग्बाणांनी तिचें हृदय विव्हल होऊन गेलें. तिला त्या उन्मत्त वहिणींचा अत्यंत राग आला; परंतु त्या मानभंगाबद्दल तिनें एकीलाहि प्रत्युत्तर दिलें नाहीं. बहिणीनें ढकलून दिल्याबरोबर, ती - आई आपणास मोठ्या प्रेमानें भेटली, व तिनें सर्व विचारपूस केली एवढेच समाधान मानून तेथून निघालीं; व यज्ञमंडपांत थेट यज्ञकुंडाजवळ बापाला भेटण्यास आली. परंतु दक्षानें दाक्षायणीला पाहिल्याबरोबर आपल्या कपाळास आंठ्या घातल्या, व तो तिरस्कारानें तिच्याकडे पाहूं लागला, तथापि बापाच्या त्या तिरस्काराकडे लक्ष न देतां पार्वती बापाला नमस्कार करण्याच्या उद्देशानें तशीच जवळ उभी राहिली, परंतु दक्षाला तिचें दर्शनही नकोसें झालें. पार्वतीच्या अंगावरील रुद्राक्ष, भस्म वगैरे शंकरांचीं भूषणे पाहून त्याला मागील यज्ञाची स्मृति झाली, व तो तिजवर क्रुद्ध होऊन दुसरे बाजूस तोंड फिरवून बसला. हा वेळपर्यंत पार्वतीनें आपला राग आंवरून धरला होता, परंतु प्रत्यक्ष जन्मदात्या पित्यानें आपली अवहेलना करून इतका मानभंग केला, हैं तिला सहन झालें नाहीं. त्यांतून यज्ञ- कुंडाजवळ सर्व देवांचे हविर्भाग आहेत, परंतु महादेवाचा हविर्भाग नाहीं हें पाहून 14 [ स्तबक