पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ [ स्तबक खरा सखा होय. तेव्हां मला आपण त्या यज्ञासाठी जाण्याची परवानगी द्याल तर मी मोठ्या संतोषानें जाईन." पार्वतीचें तें बोलणें ऐकून महादेव ह्मणाले; " पार्वती ! तो तुझा बाप दक्ष अत्यंत उन्मत्त झाला आहे. ज्याचा मूळ स्वभाव गर्विष्ठ असतो, तो विद्या, तप, धन, तारुण्य, कुल व यज्ञ यामुळे अधिक उन्मत्त होतो. या यज्ञामुळे तर दक्षाला स्वर्ग दीड बोट उरला असेल, अशा उन्मत्त पित्याकडे जाण्यांत शोभा ती काय ? शिवाय तुझ्या बापानें देवांनी यज्ञ केला होता, त्या वेळी माझा केवढा अपमान केला, हें तुझ्या लक्षांत नाहीं काय ? कोणत्याहि यज्ञप्रसंगी मला हविर्भाग देऊं नये, असे त्यानें सर्वोनां बजाविले आहे. मी त्याच वेळीं शाप देऊन त्याला दग्ध करून टाकिलें असतें, पण केवळ तुझा पिता ह्मणून मी आपला राग दाबून टाकिला. त्या वेळीं तो मला मनास वाटेल तें बोलला पण मूर्खाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे हा थोरांचा धर्म असल्यामुळे मी स्वस्थ बसलों. तुला याबद्दल खात्रीनें राग यावयाला पाहिजे. असे असून जर तुझी जाण्याची इच्छा असेल, तर माझी कांहीं हरकत नाहीं. पण हें लक्षांत ठेव कीं, तुला तेथे कोणीहि मान देणार नाहीं. आपला हा असा भिक्षूचा पोषाख आणि तुझ्या त्या बहिणी नानाप्रकारच्या रेशमी वस्त्रांनी व सुवर्ण, मोतीं, रत्नें यांच्या बहुमूल्य अलंकारांनी सालंकृत अशा असतील, त्या तुला पाहिल्याबरोबर हांस- तील, तुझा उपहास करितील आणि तुझी निंदाहि करितील. अकिंचन अशा पुत्रा- लाहि आईबाप विचारीत नाहींत, मग तूं तर मुलगी आहेस, त्यांतून आतां तर त्या दक्षाचें व माझे वितुष्ट झाल्यामुळे तूं त्यांच्या अप्रीतीला अधिक कारण झाली आहेस. शरिराला पडलेलीं क्षतें बरीं होतात, पण मनाला झालेली क्षते मरणकाळपर्यंत बरी होत नाहीत, असा स्वभावधर्म असल्यामुळे मी तर त्या दक्षाचा उन्मत्तपणा कधींहि विसरणार नाहीं." शंकरांचें हें भाषण ऐकून पार्वती अत्यंत खिन्न झाली, व निराशवाणीनें म्हणाली; " स्वामी ! आपली इच्छा नसल्यास मी मुळींच जाणार नाहीं, आपण मला सर्वोपेक्षां अधिक आहांत, आईबापापेक्षां स्त्रियेला पति हा अधिक प्रिय व पूज्य असतो. तेव्हां आपला ज्यानें अपमान केला, ज्यानें आपला हविर्भाग बंद केला, त्याचा मलाही राग येणें साहाजिक आहे, परंतु एकवार आईचें दर्शन घ्यावें व बहिणींनां भेटावें अशी इच्छा आहे. या यज्ञसमारंभासाठी त्या सर्व एका ठिकाणी जमल्या आहेत, तेव्हां त्या सर्वांची एकाच वेळी भेट होईल. यज्ञाचे निमित्तानें मला आईकडे जातां तरी येईल, नाहींतर पुढे मी तिला कोणत्या प्रसंगी भेटणार ? तेव्हां केवळ आईच्या दर्शनासाठीं तरी मला आपण जाण्यास परवानगी द्याल अशी आशा आहे. : पार्वतीनें महादेवाची अशी विनंति केल्यावर महादेवास दयां आली, व त्यांनी तिला नंदीवर बसवून व बरोबर कांहीं शिवगण देऊन क्षिप्रातीराकडे मार्गस्थ केलें. कथाकल्पतरु.