पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय ८ वा. सांगितलें. दक्षिण दिशेकडे यमाची स्थापना केली. आमय दिशेला अग्नि, वायव्य दिशेला वायु, ईशान्य दिशेला ईशान, आणि नैर्ऋत्य दिशेला निर्ऋति, याप्रमाणें अष्टदिशेला अष्ट दिक्पाळांना संरक्षणासाठी ठेविले, मंडपाला चार भव्य दरवाजे होते. त्या दरवाजांवर ब्रह्मदेव, उद्गाता, वगैरेंना संरक्षक ह्मणून नेमिलें. मग अध्वर्यु आणि होता यांनां वरिलें. चौकोनी कुंड तयार केले. त्या कुंडांत गार्हपत्य, दक्षिणाग्नि व आहवनीय अशा तिन्ही अग्नींची स्थापना केली. नानाप्रकारची यज्ञाला लागणारी भांडीं गोळा केलीं. वेद- मंत्रानें गायत्रीदेवीला आव्हान केले. शंकू, स्रुवा, कृष्णाजिनें, आज्यस्थाली, दर्भ, फुलें, गोमूत्र, गोमय, सोमवल्लीचा रस व तो पिण्यासाठी चमस नावाची चौकोनी पात्रे, स्रुवे, समिधा वगैरे सर्व साहित्य आणल्यावर मध्यभागी प्रचंड कुंड तयार करून त्या कुंडाची पूजा केली; नंतर मार्केडेय ऋषीला ब्रह्मासनावर बसविलें; आचार्यासनावर भृगु ऋषीला बसविलें; आणि यजमानाचे आसनावर स्वतः दक्ष आपली स्त्री प्रसूती हिला घेऊन बसला. भृगूनें त्यांच्याकडून प्रथम कलशपूजा पुण्याहवाचन करविलें. मग सर्व ऋषीब्राह्मणांनां सुपाऱ्या देऊन रत्ने व नारळ दिले, व अग्नि सिद्ध करून होमहवनास आरंभ केला. घृतांनीं भरलेली मोठमोठी आज्यपात्रें जवळ ठेविली होती, त्यांतून ऋषि अग्नीवर घृत होभूं लागले, मंत्रांचा घोष सुरू झाला, आणि यज्ञास योग्य अशा वस्तूंच्या आहुत्या यज्ञकुंडांत पडूं लागल्या. पुण्याहवाचन संपल्याचर दक्ष- पत्नी प्रसूतीने सर्व ऋपींना नमस्कार केला; तेव्हां मार्कडेय ऋषींनीं तिला अखंड सौभाग्यवती होशील ह्मणून आशीर्वाद दिला. करवून १ त्या यज्ञसमयीं सर्व ऋषी वगैरे ब्रह्मचर्यव्रतानें राहून फक्त दूध पिऊन निर्वाह करीत होते. कित्येक दिवस यज्ञ चालल्यावर यज्ञमंडपांत अप्सरा व गंधर्व येऊन त्यांनीं नृत्यगायनास आरंभ केला. टाळ, वीणा, मृदंग वगैरे वाद्ये त्यांनी आपणाबरोबर आणि- लीं व तीं वाजविणारे कुशल असे गंधर्व आले होते; नाचण्यांत निपुण व गाण्यांत गुणी अशा रंभा, मेनका, सुकेशी, मंजुघोषा, उर्वशी, तिलोत्तमा, वगैरे अनेक अप्सरा आल्या होत्या. त्यांचे अनुपमेय सौंदर्य, बहुमूल्य चित्ताकर्षक पोषाख, ठेकेदार नृत्य, व आलापदार गाणे ऐकून यज्ञमंडपांतील प्रेक्षक वगैरे सर्व चित्रा- सारखे तटस्थ होऊन गेले. त्या अप्सरा जेव्हां शृंगार, वीर, बीभत्स, शांत, भयानक, करुण, अद्भुत, रौद्र, हास्य या निरनिराळ्या रसांचे प्रकृतिचित्र हुबेहुब दाखवूं लागल्या, तेव्हां तर सर्वजण गुंग होऊन गेले. याप्रमाणे तो दक्षाचा महायज्ञ, मंत्रघोषा बरोबरच नपुरांच्या ध्वनींनीं व संगीताच्या आला- पांनी पहावयाला व ऐकावयाला मनोहर असा झाला होता. "