पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय ८ वा. करितां त्याच्याशी वैर जोडून घेणें हा अत्यंत मूर्खपणा होय. पतंग दिव्यावर उडी मारून जसा दिव्याला न विझवितां स्वतःलाच मारून घेतो; किंवा मासा भक्ष्य म्हणून जसा गळाला चिकटतो, त्याप्रमाणें तो दक्ष शंकराशीं वैर करीत होता. या दोघांमध्ये वैर उत्पन्न होण्याचे कारण असें झार्ले कीं, एकदां देवांनी पृथ्वीवर प्रयागाजवळ जान्हवीचें कार्टी यागाला आरंभ केला होता. त्या यज्ञा- सार्टी इंद्र, यम, वरुण, ब्रह्म, चंद्र, शंकर, अश्विनीदेव, मारुत, अग्नि, वगैरे एक श्रीहरीवांचून सर्व देव आले होते. यज्ञसमारंभासाठी ऋषि, योगी, राजे, गणगंधर्व, यक्ष, किन्नर वगैरे अनेक लोक होते. नंतर त्या यज्ञमंडपांत दक्ष- प्रजापति आला, तो आल्याबरोबर त्याच्या सन्मानासाठी सर्व देव, राजे, ऋषि, यक्ष, किन्नर, वगैरे उभे राहिले, परंतु ब्रह्मदेव व महादेव आपापल्या आसनावरून किंचित् मात्रहि उठले नाहींत. तो प्रकार पाहून दक्षाला या दोघांनी आपला मोठा अपमान केला, असें वाटलें, व तो त्यांतल्यात्यांत महादेवावर विशेष रागावला. तो क्रुद्ध स्वरानें मोठ्यानें गर्जना करून म्हणाला; " अहो देवहो ! हे दोघे पहा किती उन्मत्त झाले आहेत, माझा मान राखण्यासाठी यांनां नुसतें उभेंहि राहवत नाही काय, ब्रह्मदेव उठले नाहीं तर त्यांची गोष्ट निराळी आहे, ते माझे वडील आहेत, पण हा महादेव लोकपाळांतील असून त्यानें मी आल्या- बरोबर उठून मला विनीत मस्तकानें प्रणाम करावयास पाहिजे. हा माझा शिष्य असून शिवाय मी याला आपली मुलगी देऊन गृहस्थ केलें आहे; असें असून हा माझ्याशीं किती उन्मत्तपणानें वागत आहे, तें तुम्हीं पहातच आहां. याला ईश्वर, ईश्वर, म्हणून याचें तुम्ही देवांनीं माहात्म्य वाढविले आहे. पण याच्या अंगीं तर तशी कांहींच योग्यता नाहीं. यास पुत्र नसून हा आपल्या स्त्रियानां भोगहि देत नाहीं. हा कपटी असून याचें आचरण पिशाच्चाप्रमाणे आहे. यानें ब्रह्महत्या केलेली असल्यामुळे हा शुद्धही नाहीं, स्नान संध्या करून शुचिर्भू- तहि राहत नाहीं; पैसाअडका नसल्यामुळे दानशीलताही याच्या अंगीं नाहीं, हातांत तें नरकपाल नेहमीं असून त्या बैलावर याची मोठी प्रीति; अशा या विलक्षण पुरुषाला मी आपली मुलगी देऊन मोठी चूक केली असे मला वाटतें. शुद्राला जशी श्रुती द्यावी, किंवा चांडाळाला सरस्वती द्यावी, अथवा कृपणाला संपत्ती द्यावी, त्याप्रमाणें मी दाक्षायणी महादेवाला अर्पण करून बसलो आहे. ही त्या दक्षाची क्रुद्धपणांतील बडबड ऐकून महादेवांना फार राग आला व त्यांनीं दक्षाला शाप देण्यासाठी हातांत पाणी घेतलें. तेव्हां सर्व देवांनां वाटलें की, शंकर आतां दक्षाला भस्म करून टाकतील. मग सर्व देवांनीं महादे- वांची तसें न करण्याविषयी प्रार्थना केली, मग महादेवांनी ती प्रार्थना कबूल करून शाप दिला नाहीं, पण दक्षानें हातांत पाणी घेतले व तो म्हणाला, जर तुम्हीं हा याग रुद्राला घेऊन कराल, तर तो निष्फळ होईल. याप्रमाणे दक्षाने