पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक या सर्व मंडळीसह दशरथराजा मार्ग क्रमित असतां मागीत श्रीरामचंद्राची व परशुरामाची भेट झाली. लग्नमंडपांत रामाने जेव्हां शिवधनुष्याचा भंग केला होता, तेव्हां तो नाद दशदिशांत पसरला होता. सहस्र विजांचा कडकडाट एकदम व्हावा, त्याप्रमाणें तो भयंकर नाद ऐकून सर्व लोक भयभीत झाले होते; तो आवाज ऐकून परशुरामानें त्र्यंबक धनुष्य कोणीतरी मोडिलें असें लागलैंच ओळखिलें. तें अवाढव्य धनुष्य मोडणारा वीर कोणीतरी क्षत्रियच असला पाहिजे, असें परशुरामानें तेव्हांच जाणिलें, व तो क्षत्रिय आपण निक्षत्रिय केलेल्या पृथ्वीवर कोठून आला, याचा शोध करूं लागला. ज्यानें त्र्यंबक धनुष्य मोडिलें, तो वीर खरोखर धन्य असला पाहिजे. तेव्हां आपण आपली शक्ति त्याला देऊन त्याच्याजवळून शांति घ्यावी व अवताराची समाप्ति करावी, असा विचार करून परशुराम मार्ग क्रमित असतां मार्गात त्याची व श्रीरामचं- द्राची भेट झाली. भार्गवरामास पाहिल्याबरोबर वशिष्ठ ऋषि व विश्वामित्र ऋषि रथांतून खाली उतरले, व परशुरामाला वंदन करून हाणाले; " हे पितृभक्ता ! उदार पुरुषा ! भार्गवरामा ! हे करुणाकरा ! हे दीनवत्सला ! हे पशुधरा ! तुझी शक्ति अगम्य आहे. आह्मी तुला शरण आहोत, आह्मांवर अशीच कृपा असूं दे" मग परशुराम वसिष्ठाला ह्मणाला, " अहो वेदमूर्ति, तुह्मांबरोबर हा जो सुरम्य सुंदर कुमार आहे, तो कोण, तें मला कथन करा." तेव्हां वसिष्ठ ऋषि ह्मणाले; " भार्गवरामा ! या कुमाराचें नांव श्रीरामचंद्र असे असून हा या दशरथाचा पुत्र आहे. जनक राजाची मुलगी जानकी, शिवधनुष्याचा भंग करून यानें मिळविली आहे. " परशुरामाची ती तेज:पुंज व प्रशांतमूर्ति, ते सतेज डोळे, तो मस्तका- वरील चिकण केशांचा जटाभार, अंगावरील भस्माचे पुंडू, कंठांतील रुद्राक्षमाळा, कार्खेत सहज रुळत असलेले वैष्णव धनुष्य, हातांतील परशु, हीं पाहिल्यावर श्रीरामचंद्राचे मनांत परशुरामाविषयीं पूज्य बुद्धि उत्पन्न झाली, व त्यानें परशु- रामास वंदन केलें. तेव्हां परशुरामानेंहि रामास नमस्कार केला व तो त्याला ह्मणाला, रामचंद्रा ! हें वैष्णव धनुष्य ब्रह्मदेवानें त्रिपुरासुराचा नाश करण्या- साठी महादेवाला दिलें होतें. तें महादेवानें प्रसन्न होऊन मला दिले आहे, हें वामविण्याची जर तुला शक्ति असेल तर हें घेऊन याचा गुण चढवून दाखीव, हाणजे या धनुष्याचा तुला फार उपयोग होत जाईल. या धनुष्यानें मी सहस्रा- र्जुनाचा वंश छेदन केला आहे. हे धनुष्य तूं वागविल्यास मी तुला द्वंद्व युद्धाचा मंत्र देईन, आणि जर हें धनुष्य तूं वागविण्यास समर्थ नसशील, तर मी तुला अयोध्येस जाऊं देणार नाहीं, तुला मजबरोबर युद्ध करावयाला लावीन." हें परशुरामाचें बोलणें ऐकून श्रीरामचंद्र ह्मणाला; " हे परशुरामा ! तूं प्रत्यक्ष वेदमूर्ति आहेस, तुज बरोबर युद्ध करणे हे मला शोभणारे नसून त्यानें आपल्या कीर्तीतहि कांहीं भर पडणार नाहीं, तथापि आपली आज्ञा शिरसावंद्य करणें 66 ४२ कथाकलातरु.