पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ रा. ] अध्याय ७ वा. पूर्वज होता, त्यानें शंकराची सेवा केली त्याबद्दल शंकरांनी त्याला है बक्षिस दिले. या धनुष्याला एक महादेवाशिवाय दुसरा कोणताही राजा उचलावयाला स मर्थ नाहीं. याकरितां है पेटींत पडून राहिले आहे. ह्याची बारा महिन्यांनी एकदां पूजा होते. त्या वेळीं नऊशें टोणगे लावून हें सभेत आणितों. असे हें धनुष्य देवांनां व मनुष्यानां न हालणारे आहे, परंतु एके वेळीं तें धनुष्य पूजेकरितां आणिलें होतें, त्या वेळीं सीतेनें वालपणच्या स्वभा वाप्रमाणें तें धनुष्य त्या पेटींतून काढून त्याचा घोडा केला, व ती अगदी लीलेनें तो इकडे तिकडे फिरवू लागली. तो चमत्कार पाहून आम्हां सर्वोनां फार आश्चर्य वाटलें, व आम्ही त्याच वेळी असा निश्चय केला किं, जो कोणी हें धनुष्य उचलील, त्यालाच जानकी अर्पण करावयाची. हे विश्वा मित्र मुने! याप्रमाणें त्या धनुष्याचा इतिहास असून अशा प्रकारचा मी पण केलेला आहे. तेव्हां पुढे कसे करावें तें आपणच सुचवा. " जनक राजाचें तें बोलणें ऐकून विश्वामित्र म्हणाले; " राजा ! तूं त्या संबंधानें मुळीच काळजी करूं नकोस. तुला आपला पण बदलण्याचें कांहींच कारण नाही. स्वयंवराचे दिवशीं तें तुझें त्र्यंबक धनुष्य श्रीरामचंद्रच उचलील. " नंतर ठरविलेला स्वयंवराचा दिवस लवकरच आला, त्या दिवशीं देशो- देशींचे अनेक राजे महाराजे जानकीच्या प्राप्तीसाठी स्वयंवराला आले होते. लंकेचा राजा रावण हाही जानकीची लालसा मनांत बाळगून मिथिलेला आला होता. समारंभाचे वेळीं सर्व आपआपल्या आसनावर येऊन बसल्यावर त प्रचंड धनुष्य जनकानें नऊशें टोणग्यांकडून स्वयंवर मंडपांत आणून ठेविलें. माडीवर स्त्रिया बसल्या होत्या, त्यांत जानकीही बसली होती. तिनें श्रीराम- चंद्रास अगोदरच पाहिलें होतें. त्या अत्यंत सुंदर श्रीरामचंद्रानें आपणास वरात्रें अशी तिची इच्छा होती, परंतु तें प्रचंड धनुष्य मंडपांत आल्याबरोबर जानकीचें धैर्य खचलं. हें विलक्षण जड धनुष्य श्रीरामचंद्रास उचलणार नाहीं, असे वाटून ती अत्यंत निराश झाली. तें धनुष्य नसून शत्रूच आहे असे तिला वाटू लागले. तिनें तें धनुष्य रामाला उचलण्यास सोपे जावें, हाणून शंकराची कळकळीनें प्रार्थना केली. मंडपांत तें भयंकर धनुष्य आल्या- बरोबर कित्येक राजे जागच्या जागींच थंड झाले. उचलण्यासाठी कोणीही उठेना. तेव्हां लंकेचा राजा रावण हा उठून त्या धनुष्याजवळ आला, व तो ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करूं लागला. त्यानें तें धनुष्य हातांत मोठ्या कष्टानें तोलून धरून वर उचलू लागला. तो प्रकार पाहून जानकीची स्थिति मोठी चमत्कारिक झाली. या रावणानें धनुष्य उचलल्यास पणाप्रमाणे आपणास याच्या गळ्यांत माळ घालावी लागेल, या विचारानें ती मोठ्या काळजीत पडली, मग तिर्ने शंकराची प्रार्थना करून त्यास तें संकट निवारण करण्यास सांगितले.