पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ कथाकल्पतरु. [] [स्तवक तूं दहाहजार वर्ष शिळा होशलि, व ज्या वेळी या वाटेनें ऋषी येतील व त्यांचे चरणरजांचा तुला स्पर्श होईल त्या वेळी तुझा ह्या शापापासून उद्धार होईल. " विश्वामित्राचा याप्रमाणें शाप झाल्यावर रंभा शिळा झाली व शाप दिल्यामुळे विश्वामित्राच्या तपाचा भंग झाला. नंतर हे विश्वामित्र ऋषी फिरून तप करण्यास लागले. लोखंडाचा गोखुरकरून त्यावर मस्तक ठेऊन, ऊर्ध्वचरण करून, निराहार एक हजार वर्षे तप केलें. पंचाग्निसाधन, धूम्रपान, निराहार, मौन, अशा प्रकारचे नियम धारण करून एकहजार वर्षे तप केले, नंतर पद्मा- सन घालून, ब्रह्माचे ठिकाण लक्ष लावून, वायूचा निरोध करून, देहाचा त्याग करण्याकरितां तप केले. त्यायोगे मस्तकांतून धूम निघाला. त्यामुळे काल काम आणि संपूर्ण देव भिऊन गेले; पर्वत डोलू लागले; सप्तसमुद्र उचंबळू लागले; पाताळांत पृथ्वीला धारण करणारे हत्ती पृथ्वीचा त्याग करण्याविषयीं प्रयत्न करूं लागले; सारांश विश्वामित्राच्या उम्र तपाच्या योगानें त्रिभुवन संतम झाले; प्रलयकाल प्राप्त झाला किं काय, अर्से झाल्यामुळे इंद्रादिक देव त्याला शरण आले. आणि प्रार्थना करून तप पुरे करण्यास सांगितले. त्यावेळी विश्वा- मित्र ह्मणाले; जर वसिष्ठ ऋषि मला आजपासून ब्रह्मर्पि ह्मणतील तर मी तप पुरें करीन." त्यावेळी वसिष्ठानी ह्यांनां ब्रह्मर्पिश्रेष्ठ असें हाटले, तेव्हां ह्यांनी तपाची समाप्ति केली. याप्रमाणे हा वेदमूर्ति विश्वामित्र आहे. ह्याचें दर्शन होतांच महापापांचा नाश होतो. नंतर जनकानें विश्वामित्राला नमस्कार केला, आणि गौरव करून नाना प्रकारांनी पूजा केली आणि प्रार्थना केली किं, 'आपल्या दर्शनाने माझीं पातकें नाश झाली. हें नगर आपल्या आगमनानें धन्य झाले आहे. हे ऋषि ! हे दोन पुत्र आपल्याबरोबर आहेत ते कोण ? ह्यांनां घडीत असतां भवानी निश्चळ होती किं काय ? ह्यांची जननी धन्य आहे किं, जी अशा प्रकारचीं रत्नें प्रसवली, ज्याच्या घरीं ह्यांचा जन्म झाला तो पिता ही धन्य आहे, हे अत्यंत सुलक्षणी आहेत; मला वाटतें हैं मदनाचें स्थान आहे, ह्यांना हें कन्यारत्न द्यावें; परंतु मी दुष्ट पण केला आहे किं, या त्र्यंबक धनुष्याला जो गुण लावील त्यालाच सीतारत्न द्यावयाचें. जर या पणाला सोडून ही सीता रामाला दिली तर हे सर्व राजे मला हांसतील; परंतु हे कोणाचे कोण, आणि येथें कसे आले, तें मला सांगा.' त्या वेळीं विश्वामित्र ह्मणाले; सूर्यवंशीं राजा दशरथाचा हा पुत्र राम व दुसरा लक्ष्मण होय. " तें विश्वामित्राचे भाषण ऐकून जनकानें रामाला व लक्ष्मणाला आलिंगन दिलें, व पूजा केली. मग विश्वामित्र मुनि म्हणाले; "हे राजा ! तुझें धनुष्य पाहण्याकरितां उत्कंठित होऊन श्रीरामचंद्र आला आहे." त्यावेळी जनक म्हणाला; "ज्या वेळी वीरभद्रानें यज्ञांत दक्षाचा वध केला, त्या वेळी हें त्र्यंबक धनुष्य शंकरांनी धारण केलें होतें. शंकराशिवाय याला कोणीही धारण करूं शकत नाहीं. निमी म्हणून आमचा. (6