पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक 66 जावयाला निघाला आहांत, येथें कोणत्या उद्देशानें आलां अहांत. हें कृपाकरून सांगावें.” हंस श्रीकृष्णास वंदन करून म्हणाला, “आम्ही सत्य लोकीं राहतों, आम्ही ब्रह्मदेवाचे दास आहोत. आह्मीं सर्व त्रिभुवनांत हिंडत असतो. आपले दर्शन घ्यावें या उद्देशानें येथें आलों." श्रीकृष्ण त्या हंसाला पुन्हा ह्मणाले; "तुम्हीं त्रिभुवनीं हिंडत असतां, तेव्हां तुमच्या दृष्टीस एखादी सुंदर मुलगी पडली आहे काय? आमचा मुलगा प्रद्युम्न विवाहास योग्य झालेला आहे, त्याला शोभणारी एखादी मुलगी असल्यास, कोठें आहे, तें कृपाकरून सांगावें." हंस ह्मणाला; हे श्रीकृष्णा, आह्नीं वज्रपुरींस गेलो होतो. तेथील राजा वज्रनाभ या नांवाचा आहे. याची मुलगी प्रभावती फारच सुंदर असून उपवर झालेली आहे, परंतु त्या मुलीचें लग्न वज्रनाभ करीत नाहीं. कारण त्या मुलीच्या पतीकडून वज्रनाभाचा मृत्यु होणार आहे. प्रभावतीचे पतीपासून वज्रनाभाचा मृत्यु असल्यामुळे राजा स्वतः तिचें लग्न करीत नाहीं, व प्रभावतीस करितां येऊं नये ह्मणून तिला त्यानें बंदीवासांत ठेविलें आहे." हे ऐकून श्रीकृष्ण ह्मणाले; हंसा, तूं सांगितलेली मुलगी आमच्या मुलास करावी असें मनांत आले आहे, तूं आमचा सखा आहेस. ह्यासाठी तुझें साह्य अवश्य पाहिजे. तर तूं वज्रपुरीस जाऊन प्रभावतीची भेट घे आणि तिला मदनाचे रूप गुण सांगून विवाहास तिची अनुमति मिळीव. " श्रीकृष्णाची अशी आज्ञा होतांच हंसाने संतोष दर्शविला व लागलीच तो हंस व ती हंसिणी तेथून निघून वज्रपुरींत जेथें प्रभावतीला ठेविलें होतें त्या बंदी- खान्यांत येऊन उतरले. 66 १४ कथाकल्पतरू. ३ प्रभावतीला हंसदर्शन. त्या वज्रनाभराजानें प्रभावतीला एका विस्तीर्ण उद्यानांतील प्रासादांत ठेविलें होतें, ते उद्यान फारच मनोहर होतें. सत्यलोकीच्या हंसांना देखील ती रमणीय बाग पाहून फार आल्हाद झाला. द्वारकेहून एकदम वज्रपुरीस आल्यामुळे हंस फार थकले होते. त्या उद्यानांत आल्यावर हंसांनी थोडी विश्रांति घेतली, एका सरोवरांत मजन केले व त्या सरोवरांतील कमळाचे तंतु पोटभर भक्षण केले. नंतर तें मनोहर उपवन पहात पहात ते हंस इकडे तिकडे हिंडूं लागले. उपवनांत आंब्याची, फणसाचीं, बकुलाची, चाफ्याचीं, चंदनाची वगैरे अनेक झाडे होतीं. जाई-जुई, चमेली, मोगरा वगैरे अनेक वेली पुष्प-भारानें डुलत होत्या. कोकीळ, मोर, सारिका, वगैरे अनेक पक्षी मंजूळ स्वरानें गात होते. याचवेळी प्रभावती आपल्या सख्यांसह गौरीच्या पूजेसाठी त्या बागेंत फुलें तोडीत होती, तिच्या दृष्टीस तो नवीनच कांचनाप्रमाणे चमकणारा हंस- पक्षांचा जोडा पडला व तिला मोठे आश्चर्य वाटलें. प्रभावतीस ते पक्षी धरावे असे वाटले, म्हणून तिने आपल्या सख्यांनां गडबड न करितां शांत राह- अण्यास सांगितलें, व आपण हंसास धरण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु हंस