पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ १ लें. ] अध्याय ३ रा. या करितां करितां इंद्राच्या असे लक्षांत आलें कीं, द्वारकेंत श्रीकृष्ण परमात्मा केवळ दुष्टांच्या संहारासाठी अवतार धारण करून राहीले आहेत, तेव्हां त्याचें साह्य मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्म्याचें स्मरण होतांच इंद्र अमरावतीहून निघून लागलाच द्वारकेस आला. इंद्र द्वारकेंत आल्या- वर श्रीकृष्ण त्यास सामोरे गेले व त्याचा मोठा सन्मान करून त्यास आपल्या घरीं घेऊन आले. श्रीकृष्णानें त्यास जेव्हां कुशल विचारलें, तेव्हां इंद्र म्हणाला, " हे मुरारी, तुझ्या कृपें करून सर्व कुशल आहेत; परंतु एक मोठे संकट ओढ- वलें आहे. वज्रनाभानें फार धुमाकूळ मांडला आहे. पृथ्वीवरील सर्व भूपाळ व अष्टदिशांचे दिक्पाळ जिंकून त्याने आपल्या बंदिखान्यांत टेविले आहेत. तो आतां अमरावती मागत आहे, न दिल्यास युद्धास उभे रहा म्हणून म्हणत आहे. 'अंगावांचून जो नर असेल, त्या वांचून इतरांकडून तुला मृत्यु येणार नाहीं ' असा चमत्कारिक वर ब्रम्हदेवानें त्याला दिला आहे. वरप्रदानामुळें तो अत्यंत उन्मत्त झाला असून सर्वांना त्रस्त करीत आहे; म्हणून मी तुजकडे आलो आहे. " इंद्राचें हें भाषण ऐकून श्रीकृष्ण म्हणाले. हे सुरेश्वरा, त्या वज्रनाभानें वर मोठा अवघड मिळ- विलेला आहे. अंगावांचून असा नर या त्रिभुवनांतहि कोणी नाहीं; तेव्हां वज्रनाभाचा नाश होणें मला तर कठीण वाटतें. " कृष्णाचें हैं बोलणे ऐकून इंद्र म्हणाला; हे मुरारी, तूं त्रिकाळज़ असून तुला सर्व कांहीं समजतें. मागें हिरण्य कश्यपाचे वेळेस असेंच संकट पडले होते, पण तूं त्यावेळी नारसिंह रूप धारण करून त्या संकटाचें निवारण केलेंस समुद्र मंथनाचे वेळी दैत्यभारामुळे पृथ्वी रसातळास जाऊं लागली तेव्हां तूंच रक्षण केलेस. श्रुतीचे संरक्षण शंखासुराचा नाश करून केलेंस, हिरण्याक्ष असाच मातला होता, त्यावेळी तूं वराह अवतार घेऊन त्याचे हनन केलेंस बळीने अमरावती घेतली होती, तिचें तूं वामन रूप धारण करून रक्षण केलेंस; अशी तुझी शक्ति असतां वज्रनाभासारख्या राक्षसाचा नाश करण्यास तुला अवकाश तो किती लागणार ? " २ हंस श्रीकृष्णसंवाद. असो, इंद्राचें वरील भाषण ऐकून, श्रीकृष्ण हाणाले, देवेंद्रा, या वज्रना- भाचें मरण कोणापासून आहे तें आतां माझ्या लक्षांत आलें. मदनापासून वज्रनाभाचा मृत्यु आहे. कारण मदन हा शरीरावाचून आहे. आतां मदनाचा रिधाव वज्रनाभाकडे कसा होईल याची काही योजना योजिली पाहिजे, " याप्रमाणें देवेंद्र व श्रीकृष्ण बोलत असतांनां तेथें अंगणांत एक हंस व एक हंसिणी अशी जोडी येऊन बसली. ते हंस सत्यालोकीचे असून मनुष्याप्रमाणें स्पष्ट बोलत होते. त्या पक्षाकडे पाहून श्रीकृणास परम संतोष झाला, ते त्या हंसाला ह्मणाले; "हंसानों, तुम्हीं कोठें राहतां, हल्ली कोणी कडे 6