पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय ७ वा. 6 दुराचारी, दैवहत, वेदवेत्ता अजीगर्त नावाचा ब्राह्मण भेटला. त्याला राजदूताने सांगितलें कि, जर तूं आपला पुत्र हवनाकरितां देशील तर एक हजार सालंकृत गाई मिळतील. ब्राह्मणानें ती हकीकत आपल्या स्त्रीला सांगितली. आणि ह्मणाला, एक हजार गाई मिळाल्यावर आपले सर्व दरिद्र दूर होईल व तुलाही आणखी पुष्कळ चांगले चांगले अलंकार धारण करण्यास मिळतील. आपणांस तीन पुत्र आहेत, त्यांतील एक दिला तरी आपणांस दोन शिल्लक आहेतच. कालाने जर एकादा नेला तर आपण त्यास काय करणार ? शिवाय ईश्वरकृपेनें आणखी पुत्र होणार नाहींत हैं तरी कशावरून १ " तेव्हां स्त्री म्हणाली; " आपलें ह्मणणे मला कबूल आहे, परंतु मी आपला कनिष्ठ पुत्र देणार नाही " व अजीगतनें सांगितले किं, ' ज्येष्ठ पुत्रानें मी पुत्रवान् असल्यामुळे ज्येष्ठपुत्र मला देतां येत नाहीं. तेव्हां मधला पुत्र शनःशेष देण्याचा संकल्प केला. त्यावेळी राजदूताने सहस्र गाई अजीगर्ताला दिल्या व तो पुत्र घेऊन निघाला. त्या नष्ट अजीगतने पुत्र विकून द्रव्य मिळविलें. जसें बेडकास तोंडांत धरावें तरी तो माशी खात असतो, अजीगर्त मुलाला विकून आपण जगण्याची इच्छा काळाचे खाद्य आहे, देह माझा असें होत नाहीं. या मृत्युलोकी राजांचा व रंकांचा करित म्हणून तो आपला सर्वांचा संहार झाला आहे. तो अजीगर्त मृत झाल्यावर त्याला यमदूतांनीं यमलोकीं नेलें व नाना प्रकारांनी पुष्कळ जाचणी केली. इकडे राजदूतानें शुनशेपाला आणून अंबरीष राजाच्या पुढे उभें केलें. राजानें तो विकत आणिलेला द्विजपुत्र पाहिला, त्याच्या अंगाला चंदनाची उटी लाविली, गळ्यांत पुष्पमाळा घातल्या, व यज्ञस्तंभाशी बांधिलें, त्या वेळी शुन:शेपार्ने आपला मरणकाळ जवळ आला आहे असें जाणून विश्वामित्राची प्रार्थना केली. कौशिक यागाकरितां तेथें आला होता त्यानें तो बालक कथज्ञ स्तंभाला बांधिलेला पाहिला. त्याचा कंठ कापून इंद्रादिक दिपतींनां आहुती देणार इतक्यांत विश्वामित्रानें त्यांनां सांगितलें किं, "तुझी राजाला असें सांगा किं, आझी तृप्त झालों. तुला ह्या यशाचें फल मिळेल आणि हा तुमचा भाग शुनः शेप मला द्या; या प्रमाणें तुझी कबूल न केल्यास तुझाला शाप देईन त्यावेळी त्या विश्वामित्राच्या भीतीनें देव राजाला झणाले; हे राजा ! आह्मी तृत झालों व नरयागाचें फल तुला दिलें. ह्या यागाच्या योगानें तुला दोन पुत्र होतील आतां ह्या ब्राह्मणपुत्राचें कंठबंधन सोड" असे सांगून देव आपल्या स्थानाला निघून गेले. हे जनक राजा ! अशा रीतीनें विश्वामित्रानें शुन:शेप सोडविला अशी याची अगाध कीर्ति आहे. हे जनका ! या विश्वामित्राची आणखी तिसरी ख्यति •सांगत. पूर्वी इंद्रानें विश्वामित्राच्या तपश्चर्येचा भंग करण्याकरितां रंभा नांवाच्या असरेला पाठविलें; तें विश्वामित्रानें जाणून तिला शाप दिला किं, " हे रंभे ! 22 सर्पानें त्याप्रमाणें आहे. देह हा