पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ [स्तक व्यर्थ (6 शतानंद म्हणाला; राजा जनका ! हा विश्वामित्र प्रतिसूर्य आहे. याची कीर्ति त्रिभुवनांत राहाणार नाहीं अशी आहे. " तेव्हां जनकानें ती ऐकण्याविषयी प्रेम दाखविल्यामुळे शतानंद सांगू लागला: "पूर्वी सूर्यवंशीं त्रिशंकु नावाचा राजा होता, जानें नैमिषारण्यामध्यें यज्ञ करण्यास आरंभ केला. त्याने आपल्या कुलगुरु वसिष्टपुत्रांचा प्रार्थना केली किं, तुम्हीं असें हवन करा किं, ज्या योगानें .मी शरीरासह स्वर्गी जाईन." त्यावेळापत्र म्हणाले; "राजा ! हें तुझं म्हणणे अज्ञानाचें आहे. राजा ! सदेह स्वर्गी जाण्याचा तुझा पयत्न आहे. सूर्य पश्चिमेस उगवेल, परंतु सदेह स्वर्गी जाणें होणार नाहीं. " तेव्हां त्रिशंकु म्हणाला; तुम्हांला यागाची माहिती नाहीं. बरें मी आतां दुसरा आचार्य आणून त्याकडून याग करवितों." हें त्रिशंकूचे बोलणें ऐकून ऋषिपुत्रांनां फार राग आला व त्यांनी त्रिशंकूला शाप दिला किं, " तूं चांडाळ होशील " ऋषींनी शाप दिल्याबरोबर त्यांचें शरीर चांडाळाचें झालें व त्यामुळे त्याचा याग राहिला. नंतर त्रिशंकु राजा विश्वामित्राला शरण आला, आणि त्यानें झालेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हां विश्वामित्र म्हणाला; " हे राजा ! मी तुला निर्दोष करून याच देहानें तुला स्वर्ग दाखवीन. नंतर विश्वामित्रानें त्रिशंकु सशरीर स्वर्गी जाण्याकरितां बीजमंत्रानें यागाला आरंभ केला. यज्ञाची पूर्णाहुती देतांक्षणीच यज्ञनारायण प्रसन्न झाला व त्यानें त्रिशंकूला सदेह स्वर्गी नेलें. तेव्हां सर्व देव धांवत आले, व त्यांनीं, हा गुरुशापामुळे अपवित्र आहे याकरितां सदेह स्वर्गी येण्याला योग्य नाही, असे म्हणून त्याचे डोकें खाली केलें व पाय वर करून त्यास. - साली लोटून दिला. त्यावेळी त्रिशंकूने आर्त स्वरानें विश्वामित्राला हाक मारून सांगितले किं, माझें रक्षण करावें तें ऐकून विश्वामित्राला फार राग आला क त्याने आपल्या मंत्रसामर्थ्याने त्रिशंकूला आकाशांत दक्षिण दिशेचा ध्रुव करून ठेविलें. आणि सांगितले किं, " जोपर्यंत उत्तरध्रुव, नक्षत्रे, चंद्र व सूर्य आहेत तोपर्यंत तूं आकाशांत स्थिर रहा. " नंतर प्रतिसृष्टि करण्याकरितां विश्वामित्राने हातांत उदक घेतलें, त्यावेळी सर्व देव विश्वामित्राची प्रार्थना करून म्हणाले, आपण असे करूं नका. आम्ही त्रिशंकूला स्वर्गात नेतों. नंतर देवांनी त्रिशंकुला विमानांत घालून स्वर्गी नेले. याप्रमाणें विश्वामित्राची ख्याती त्रिभुवनांत आहे.. शतानंद जनकाला विश्वामित्राची आणखी कीर्ति सांगू लागला. तो ह्मणाला-- पूर्वी सूर्यवंशी अंबरीष म्हणून राजा होता. त्यानें वसिष्ठपुत्राची प्रार्थना केली कि, मला पुत्र नाहीं तर काय केले असतां पुत्र होतील." त्यावेळी वसिष्ठपुत्रानें सांगितलें “ हे राजा ! नरयाग केला असतां तुला पुत्र होतील. " तें गुरुपुत्रान्वें भाषण ऐकुन राजाला धन्यता वाटली, आणि पुरोहिताला सांगितलें किं, एक हजार सालंकृत गाई देऊन मनुष्य आणावा. त्यावेळी पुरोहितानें एक दूत मनु- प्याच्या शोधाकरितां पाठविला. नंतर पृथ्वीवर शोध करितां, केकय देशांमध्ये एक 66 "(